वाई: माण तालुक्यातील संभूखेड गावचे जवान सचिन विश्वनाथ काटे (वय २४) यांना देशसेवा बजावत असताना राजस्थान येथे वीरमरण आले. या घटनेमुळे माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. काटे हे राजस्थानमध्ये सेवा बजावत होते. येथेच बुधवारी (दि.२०) त्यांना रात्री वीरमरण आल्याची माहिती त्यांचे भाऊ रेवन काटे यांना लष्कराकडून देण्यात आली. काटे पाच वर्षापूर्वी भारतीय सेनेत भरती झाले होते. सचिन काटे यांना वीर मरण आल्याची माहिती मिळताच माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई, वडील आणि भारतीय लष्कराच्या सेवेत असलेला भाऊ रेवन असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील गावी शेती करतात. काटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin kate indian soldiers jawan maan taluka akp
First published on: 22-10-2021 at 23:27 IST