सांगली : चालकाला डुलकी लागल्याने क्रूझर जीप टोल नाक्यावरील रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशी जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर शनिवारी पहाटे हा अपघात घडला असून अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
चालकाला डुलकी लागल्याने मोटार टोल नाक्याच्या रस्ता दुभाजकावर आदळली. यामुळे मोटार पलटी झाली. मोटारीतील १३ जण जखमी झाले असून सर्व जखमींना मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन निपाणीहुन पंढरपूरला निघाले होते.



