ओ साहेब, जरा पोते उचलू लागा म्हणताच एक सुटाबुटातील व्यक्तीने एक नव्हे तर तीन कांद्याची पोती मजुराच्या मदतीला धावली. मात्र, ही व्यक्ती होती, उङ्ख विद्याविभुषित असलेले सांगलीचे जिल्हाधिकारी. आणि हा मदतीचा हात देतांनाचा क्षण छायांकित केला ते अधिकारी होते वन विभागातील.

हेही वाचा >>> दुकानदाराच्या उत्तराने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची पंचाईत

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  मुंबईमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोगाच्या बैठकीसाठी मुंबईत गेले होते. निवडणूक आयोगाची बैठक आटोपल्यावर बाहेर रस्त्यावर आले. याच वेळी  एका हातगाडीवाल्या मजुरांने पोते उचलू लागण्यास मदत करण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी पदाचा अधिकार, मान मरातब रस्त्यावर न मानता डॉ. दयानिधी यांनी या मजूराला तीन पोती उचलण्यास मदत केली. या दरम्यान, त्यांच्यासोबत असलेले उपवन संरक्षक राहूल पाटील हेही सोबत होते. त्यांनीही जिल्हाधिकार्‍यांना काहीच कल्पना नसताना हे दृष्य भ्रमणध्वनीवरील कॅमेर्‍यामध्ये कैद केले. आणि ही छबी आज दुपारपासून जिल्हाधिकार्‍यांचा साधेपणा या शिर्षकाखाली समाज माध्यमावर प्रसारित झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.