Sangli Crime : अवघ्या १०० रुपयांच्या मोबाइल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीत खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली. विपुल अमृतपुरी गोस्वामी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मोबाइल दुकानाता काम करत होता. सांगलीतल्या बस स्थानकावर असलेल्या मोबाइल शॉप मध्ये स्क्रीन गार्ड घेण्यासाठी काही तरुण आले होते. या स्क्रीन गार्डची किंमत विपुलने १०० रुपये सांगितली. मात्र स्क्रीन गार्ड ५० रुपयांना मिळतो असं सांगत या तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली त्यातूनच ही हत्या झाली अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल दुकानात ग्राहक बनून आलेल्या चौघांचा तरुणावर हल्ला

मोबाईल दुकानात ग्राहक बनून आलेल्या हल्लेखोरांनी १०० रुपयांचे स्क्रीन गार्ड ५० रुपयांना मागितले होते. मात्र, दुकानातील कामगाराने ते ५० रुपयांत देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच चार तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत दुकानातील कामगाराचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, त्यानंतर तपासाची चक्रं फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना अटक केली आहे. मात्र, क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद एका कुटुंबावर मोठा दु:खाचा आघात देऊन गेला. घरातील कर्ता तरुण गेल्याने गोस्वामी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तीन हल्लेखोरांना घेतलं ताब्यात, एकाचा शोध सुरु

दरम्यान, या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सांगली शहर पोलिसांनी काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.