दूध दरवाढीच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी राज्यात विविध ठिकाणी रयत क्रांती संघटनेकडून दूध बंद आंदोलन करण्या आले. या राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन अंतर्गत  इस्लामपूर( जि. सांगली) शहरात दूध गाड्या अडवून गरिबांना संघटनेचे सागर सदाभाऊ खोत, आबा भांभुरे, स्वप्नील सुर्यवंशी आदींनी दूध वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- करोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

महायुतीचे नेते व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या चरणी दुधाचा अभिषेक केला. ‘दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान  व दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याची राज्य सरकारला सुबुद्धी दे बा…विठ्ठला’ असे पांडुरंगाच्या चरणी साकडे यावेळ घालण्यात आले.

आणखी वाचा- दूध दरवाढीसाठी ‘रयत क्रांती’कडून राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन सुरू

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli distribution of milk to the poor by blocking milk carts in islampur msr
First published on: 01-08-2020 at 10:50 IST