सांगली : काळी खाण सुशोभीकरणामुळे सांगलीच्या सौंदर्यात भर पडली असून, हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. सांगली शहराच्या ऐतिहासिक काळी खाण परिसराला नवे रूप देत, आधुनिक सुविधांनी समृद्ध अशा काळी खाण सुशोभीकरणाने सांगलीच्या पर्यटन सौंदर्यात भर पडली आहे.

महापालिका क्षेत्रातील काळी खाण सुशोभीकरण प्रकल्प व हनुमाननगर येथील अद्ययावत भाजी मंडई या प्रकल्पांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

सांगली शहराच्या ऐतिहासिक काळी खाण परिसराला नवे रूप देत, आधुनिक सुविधांनी समृद्ध अशा काळी खाण सुशोभीकरणाने सांगलीच्या पर्यटन सौंदर्यात भर पडली आहे. सुशोभीकरण कामे दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांत पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण परिसराचे आधुनिकीकरण व सौंदर्यवर्धन केल्यामुळे काळी खाण हे सांगलीकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ ठरणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ५ लाख, तर दुसऱ्या टप्प्यात ४ कोटी ४३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून काळी खाण येथे बगीचा, संगीत कारंजे, खाद्य पेयविक्रेत्यांसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच हनुमाननगरमध्ये दोन कोटी रुपये खर्च करून सोयी-सुविधांनी युक्त स्वच्छ भाजी मंडई उभारण्यात आली असून, त्याचेही लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सांगली शहराच्या ऐतिहासिक काळी खाण परिसराला नवे रूप देत, आधुनिक सुविधांनी समृद्ध अशा काळी खाण सुशोभीकरणाने सांगलीच्या पर्यटन सौंदर्यात भर पडली आहे. सुशोभीकरण कामे दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांत पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण परिसराचे आधुनिकीकरण व सौंदर्यवर्धन केल्यामुळे काळी खाण हे सांगलीकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ ठरणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ५ लाख, तर दुसऱ्या टप्प्यात ४ कोटी ४३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून काळी खाण येथे बगीचा, संगीत कारंजे, खाद्य पेयविक्रेत्यांसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. या काळी खाण सुशोभीकरणामुळे सांगलीच्या सौंदर्यात भर पडली असून, हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.