सांगली : मिरजेत नव्याने तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक तबल्यावर उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बोटांची जादू ऐकण्याची संधी हुकल्याची खंत तबला निर्माते विजय व्हटकर यांनी सोमवारी व्यक्त केली. २०१३ मध्ये ते मिरजेत आले होते. त्यावेळी व्हटकर यांच्या मातोश्री व माजी नगरसेविका सुलोचना व्हटकर यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त औक्षण केले होते.

उस्ताद हुसेन यांचे मिरजेशी अनेक वर्षांपासूनचे स्नेहसंबंध होते. विशेषत: पुण्यात आल्यानंतर त्यांची एखादी फेरी मिरजेत असायचीच. यावेळी ते हटकून व्हटकर यांच्या तबलानिर्मिती केंद्राला भेट देत असत. आणि तबला तयार करत असताना काय खबरदारी घ्यायची, कडी, पुडी कोणती असावी, ताण कसा आणि किती काढावा लागेल याची माहिती देण्याबरोबरच शाई कशी आणि किती घोटायला हवी याची माहिती ते देत असत. तबल्याला वापरण्यात येणारे लाकूड कसे हवे, त्यात पोकळी किती असावी याचीही माहिती ते देत असत, असे व्हटकर सांगतात.

हेही वाचा – भुजबळ-मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे दोन्ही नेते…”

हेही वाचा – Sushma Andhare : जय श्रीरामच्या घोषणा देत सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; फेसबुक पोस्ट करत सांगितले पहाटे ३ वाजता काय घडले

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवेचा कोणताही परिणाम होणार नाही, तसेच विना चमड्याचा तबला तयार करण्यात आल्याचे आणि त्याचे स्वामित्व घेतल्याचे उस्ताद यांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी २ डिसेंबरदरम्यान मी पुण्यात येत आहे. त्यावेळी मला दाखविण्यासाठी पुण्याला या असा निरोप त्यांनी स्वत: दिला होता. त्यांना नव्याने तयार करण्यात आलेला तबला वाजवून पाहायचा होता. मात्र, तत्पूर्वीच अमेरिकेतील बोस्टन येथे कार्यक्रमास गेले असताना हॉटेलमध्ये त्यांच्या छातीत दुखू लागल्याने कार्यक्रम रहित करून सन फ्रॅन्सिस्कोमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेच त्यांना मृत्यूने गाठले. बारा वर्षांपूर्वी त्यांनी व्हटकर यांच्या घरी भेट दिली, ती मी आल्याचे कोणालाही कळता कामा नये या अटीवर असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी त्यांनी माजी नगरसेविका श्रीमती व्हटकर यांच्याशी मराठीतून संवाद साधत असताना मी महाराष्ट्रात मोठा झालो आहे, मला चांगले मराठी बोलता येते, समजते असे सांगत औक्षण स्वीकारले होते. आणि त्याच वेळी त्यांचा वाढदिवसही होता असे व्हटकर यांनी सांगितले.