उधारीवर अंडाबुर्जी देण्यास नकार दिल्यामुळे चिडून एका तरुणाचा धारदार हत्याराने खून झाल्याचा प्रकार सांगलीत घडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सात संशयितांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

संतोष पवार हा मारुती ओमनी या वाहनातून अंडाबुर्जी विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी सायंकाळी शंभरफुटी रस्त्यावर आंबेडकर वाचनालय समोर व्यवसाय करत असताना संशयित बुर्जी खाण्यासाठी आले. उधारीवर बुर्जी मागितली असता संतोषने नकार दिला. त्यावेळी संतोषवर धारदार हत्याराने वार करण्यात आले. त्यातच संतोष जागीच ठार झाला.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून हल्लेखोरांचा माग काढला चौकशीसाठी सात जणांना ताब्यात घेतले असून हा खून केवळ उधारीवर झाला नसल्याचे समजते. संतोष यांने सहामहिन्यापूर्वी एकाला संपवून टाकण्याची धमकी दिली होती. त्यातून हत्या झाली असावी असा तपास पथकाला संशय आहे.