सांगली : अंध मुलांमध्ये अंधश्रद्धा निर्मुलनाचे विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा यासाठी अंध मुलांकडून ब्रेल लिपीतील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुस्तके छापण्यात आली असून या ब्रेललिपीतील पुस्तकांचे गुरुवारी मिरजेतील नॅब संचलित निवासी अंधशाळेच्या मुलांनी वाचन केले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सांगली शाखेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. दाभोळकरांच्या दहा पुस्तिका ब्रेल लिपीमध्ये उषा अशोक येवले यांनी रुपांतरित केल्या आहेत. या पुस्तकांचा एक संच अंनिसच्या वतीने अंधशाळेत भेट देण्यात आला. ब्रेल लिपी ही कोर्‍या कागदावर ठिपक्यापासून तयार झालेली असते. ही लिपी डोळस माणसाला समजत नाही, पण अंध व्यक्ती हाताच्या बोटाच्या स्पर्शाने ती वाचतात. त्यामुळे चक्क कोर्‍या पानांतून अंध मुलांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे डोळस विचार सर्वांना वाचून दाखवले. यावेळी डॉ. दाभोळकरांच्या ’स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या ब्रेल पुस्तकातील काही उतारे साक्षी जाधव हिने तर ’फलज्योतिष शास्त्र का नाही?’ या पुस्तकातील उतारे विशाल दिवटे याने आणि ’चमत्कार सादरीकरण’ या पुस्तकातील उतारे प्रज्वल कुंभार यांने वाचून दाखवले.

eknath shinde govinda
“चालणारा तरी नट घ्यायचा”, जयंत पाटलांच्या गोविंदावरील टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर अन् सभागृहात एकच हशा
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले
actor govinda congress
‘राजकारणात येऊन मोठी चूक केली’, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गोविंदानं असं का म्हटलं होतं?

हेही वाचा – मैत्रीपूर्ण की बंड : चार दिवसांत निर्णय – आमदार सावंत

मुलांना हा पुस्तक अभिवाचनाचा कार्यक्रम खूपच आवडला. यावेळी अंध मुलांनी अनेक प्रश्न विचारले, त्यामध्ये ग्रहणामुळे अंध अपंगत्व येते का ?, वास्तुदोष असतो का?, बाधित जागी गेल्यानंतर ताप येतो आणि लिंबू टाकल्यानंतर ताप जातो हे कसे काय?, पहाटेची स्वप्न खरी होतात का? कावळा पिंडाला का शिवतो? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे अंनिस कार्यकर्त्यांनी मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगितली.

हेही वाचा – VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

यावेळी अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, जगदीश काबरे, डॉ. संजय निटवे, प्रा. अमित ठाकूर यांनी मुलांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी विष्णु तुळपुळे, डॉ. सविता अक्कोळे, त्रिशला शहा, आशा धनाले, श्रद्धा कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख कुचेकरी तर आभार मुख्याध्यापिका उज्वला हिरेकुडी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन अर्चना बारसे, मंजुषा वाकोडे, वृंदा सातपुते यांनी केले.