“बाळा आम्हीही तुझ्याकडे येत आहे” अशी चिठ्ठी लिहून तरूण माता-पित्यांनी एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आटपाडी तालुययातील राजेवाडी येथे गुरूवारी रात्री उघडकीस आला. मृत पती-पत्नीच्या दोन वर्षाच्या मुलीचा चारच दिवसापुर्वी मृत्यू झाला होता. हे दु:ख सहन झाल्याने दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहिती अशी की, करण नाना हेगडे (वय-२८) व त्यांची पत्नी शितल (वय-२२) या दोघांनी काळामळा येथे असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. मृत करण हा राजेवाडी ग्रामपंचायत सदस्या विमल हेगडे यांचा चिरंजीव आहे.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

या दाम्पत्याच्या दोन वर्षाच्या मुलीचा चार दिवसांपुर्वीच मृत्यू झाला होता. जेवण करत असताना घास गळ्यात अडकल्याने या मुलीचा मृत्यू झाल्याने ते दोघेही अत्यंत दु:खी झाले होते. या दु:खातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार समजताच आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी मृत करणजवळ एक चिठ्ठी आढळून आली. “या चिठ्ठीमध्ये बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. तुझा मृत्यू आम्हाला असह्य होत असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये.” असा मजकूर आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्ययत केली जात आहे.