सांगली : जिल्हा युवा महोत्सवामध्ये इस्लामपूरमधील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने सांघिक स्पर्धेत, तर मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालयाने वैयक्तिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. इस्लामपूरमध्ये कर्मवारी भाऊराव पाटील महाविद्यालयात झालेल्या युवा महोत्सवात जिल्ह्यातील ५८ महाविद्यालयांतील सुमारे ११०० विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणाचे प्रदर्शन केले. शुक्रवारी या महोत्सवाची सांगता झाली.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये मूकनाट्य, लोकनृत्य, लोककला, एकांकिका, एकपात्री अभिनय, लघुनाटिका/प्रहसिका, सुगम गायन, भारतीय समूहगीत, वक्तृत्व, वादविवाद, पथनाट्य, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धा रंगल्या.
लोकनृत्य या कलाप्रकारात प्रथम तीन क्रमांक पटकाविणारी महाविद्यालये अशी आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड टेक्नोलॉजी, आष्टा; भारती विद्यापीठाचे बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव आणि देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय, चिखली. तर, लोककला प्रकारात विजेते ठरलेले प्रथम तीन संघ असे- बळवंत कॉलेज, विटा; यशवंतराव चव्हाण कला महाविद्यालय, उरुण इस्लामपूर आणि श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.
जिल्हा युवा महोत्सवामध्ये पहिल्या आलेल्या तीन संघांसह चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावरील युवा महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव या वर्षी मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात आयोजित केला जाणार आहे.
इस्लामपुरात आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते व महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव सरोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी करण्यात आले होते. आज या महोत्सवाची सांगता झाली. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष एन. आर. पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग- युवा महोत्सव समिती यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. गायकवाड व डॉ. संदीप पाटील तसेच युवा महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. तेजपाल जगताप व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी या युवा महोत्सवाचे यशस्वी संयोजन केले.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये मूकनाट्य, लोकनृत्य, लोककला, एकांकिका, एकपात्री अभिनय, लघुनाटिका/प्रहसिका, सुगम गायन, भारतीय समूहगीत, वक्तृत्व, वादविवाद, पथनाट्य, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धा रंगल्या. जिल्हा युवा महोत्सवामध्ये पहिल्या आलेल्या तीन संघांसह चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावरील युवा महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव या वर्षी मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात आयोजित केला जाणार आहे.