शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. शिवजयंतीच्या दिवशी बुलढाण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड यांनी दावा केला होता की, त्यांच्या गळ्यात असलेल्या माळेमध्ये असलेला दात हा वाघाचा आहे. गायकवाड यांच्या दाव्यानंतर वनविभाग याप्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आपण वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातला आहे असा दावा गायकवाड यांनी केला होता. या वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

शिवजयंतीनिमित्त बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांपैकी गजानन शास्त्री यांनी संजय गायकवाड यांच्या गळ्यात वाघाचा दात असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर गायकवाड यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले, “१९८७ मध्ये मी एका वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात काढून गळ्यात घातला.” त्यावर गायकवाड यांना विचारण्यात आलं की वाघ होता की बिबट्या? त्यावर गायकवाड म्हणाले, वाघाची शिकार केली होती. बिबट्या वगैरेंना तर मी असंच पळवून लावत होतो.

हे ही वाचा >> “त्या हल्ल्याला राजकीय झालर”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य; रोख कोणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी आमदार गायकवाड शिवरायांच्या मावळ्याचा पेहराव करून आणि हाती तलवार घेऊन कार्यक्रमस्थळी आले. डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्यांच्या माळा, हातात तलवार असा त्यांचा पेहराव होता. यावेळी गायकवाड यांनी त्यांच्या गळ्यातील एका लॉकेटबाबत दावा केला की त्यात वाघाचा दात आहे. त्यांनी ३७ वर्षांपूर्वी एका वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातला आहे. दरम्यान, वन विभागाने गायकवाड यांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून याप्रकरणी कारवाई होऊ शकते.