कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी मतदानयंत्राचे बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत बोलताना केले होते. या विधानानंतर आता देशातील राजकीय वातवरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले.

हेही वाचा – शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे का घेतला? त्यांनीच सांगितलं कारण, म्हणाले…

काय म्हणाले संजय राऊत?

“पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकमधील प्रचारात बजरंगबलीला उतरवले. जय बजरंगबलीचे नाव घ्या आणि भाजपासाठी मतदानाचे बटण दाबा, असे ते म्हणाले. मुळात हा धार्मिक प्रचार आहे. असा धार्मिक प्रचार केल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यास अपात्र ठरवले होते. तर निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर केला म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडच रद्द केली होती. इथे पंतप्रधानांपासून त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचारात गुंतले आहेत. मात्र, कारवाई होत नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – “प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला…”, उद्धव ठाकरेंचं विधान

“…म्हणून मोदींनी हनुमानास प्रचारात आणले”

“पंतप्रधान मोदींनी विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुसलमानांचे कार्ड काढणे अपेक्षित होते. त्यानुसार त्यांनी ते काढले. खरे तर दिल्लीचे बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण हा काही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा विषय नव्हता, पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी बाटला हाऊस चकमक नव्याने सुरू केली. ते चालले नाही तेव्हा महाबली हनुमानास प्रचारात आणले,” असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – “शरद पवारांच्या तोंडून कधीही छत्रपती शिवरायांचं नाव आलं नाही, आणि मला..” राज ठाकरेंची टीका

“…तर देश पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल”

“नऊ वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे व निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल व पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.