scorecardresearch

शिवसेना कार्यालय वादावर बोलताना संजय राऊत आक्रमक; म्हणाले “स्वत:च्या मुलांना…”

मुंबई पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा काही दिवसांपूर्वी प्रयत्न केला होता.

शिवसेना कार्यालय वादावर बोलताना संजय राऊत आक्रमक; म्हणाले “स्वत:च्या मुलांना…”
संजय राऊत (संग्रहित फोटो)

मुंबई पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा काही दिवसांपूर्वी प्रयत्न केला होता. यावेळी शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, सध्या पालिकेतील सर्वच पक्ष कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले आहे. या घटनेनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. खरी शिवसेना कोणाची याबाबतचा निकाल आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयांवरील निर्णय घेतला जाईल, असे शिंदे गटातील नेते म्हणत आहेत. दरम्यान याच मुद्द्यावर बोलताना ठाकरे गटातील नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> ‘विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर अजित पवारांची स्वाक्षरी का नाही?’ भास्कर जाधव म्हणाले, “ज्यावेळी हा प्रस्ताव…”

“हिंमत असेल तर स्वत:चं काही निर्माण करा. ते नाव शिवसेने वापरत आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते असल्याचे सांगत आहेत. शिवसेना पक्षाची कार्यालयेदेखील आमचीच आहेत, असे म्हणत आहेत. मग तुम्ही काय केलं? स्वत:च्या मुलांना जन्म द्या,” असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरही भाष्य केले. “बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होत आहे? तेथील सरकार, कानडी संघटना मराठी माणसांवर अन्याय करत आहेत. तिथल्या सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने सीमाप्रश्नी ‘जैसे थे’चे आदेश दिलेले आहेत. मात्र हा आदेश पाळला जात नाही. म्हणूनच हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी केली जात आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण: अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ करण्याचा प्रस्ताव, पण अहमदनगर हे नाव नेमकं कुणामुळे पडलं?

“कर्नाटकने मराठी भाषा तसेच मराठी माणसाला संरक्षण द्यावे. त्यानंतर आम्ही आमची मागणी मागे घेऊ. याउलट मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तर महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात. येथे कानडी बांधवही राहतात. मात्र आम्हाला त्यांची अडचण नाही. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी करा म्हणणारे लोक मुर्ख आहेत,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 15:43 IST

संबंधित बातम्या