भाजपाचे नेते तथा मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणे यांनी वरील विधान केले आहे. नारायण राणेंच्या याच इशाऱ्याला आता संजय राऊतांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मला बोलायला लावू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली, तर ते ५० वर्षे तुरुंगात जातील. हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्र काढून बाहेर या. मग दाखवतो, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले आहे. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> “थेट शूट करण्याऐवजी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो,” सुषमा अंधारेंच्या विधानामुळे खळबळ

“आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? मी अद्याप त्यांच्याबाबत काहीच बोललेलो नाही. ते आमचे सहकारी होते. त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. हे मला तुरुंगात काय टाकणार. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने तुरुंगात गेलो आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हेही वाचा >>> “उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महापालिका निवडणुकीत…”; योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेनेचं टीकास्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी तुमच्यासारखा ईडीने बोलवल्यावर पळून गेलेलो नाही. मी शरणागती पत्करलेली नाही. आम्ही नामर्द नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झाले आहात का? कोण काय बोलतंय तसेच प्रत्येकाचे वक्तव्य आम्ही सरन्यायाधीशांना पाठवत आहोत. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्षे बाहेर येणार नाहीत,” अशी टीकाही संजय राऊतांनी केली.