ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी “मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत.” असं म्हणत पाकिस्तानला खडेबोल सुनावले. लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फैज उत्सवा’त एका प्रश्नाचे उत्तर देताना अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वरील विधान केलं. जावेद अख्तर यांच्या या कृतीवरून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींना टोला लगावल्याचेही दिसून आले आहे.

“इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं… ठीक है होता है. पण तिकडे जाऊन बोलण्याची हिंमत दाखवणं याला ५६ इंचापेक्षाही मोठी छाती आहे, असं मी मानतो.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

sanjay raut narendra modi
“…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”
Sharad Pawar On PM Narendra Modi
“पेट्रोलचे दर ५० दिवसात कमी करणार असं मोदी म्हणाले होते, आता तीन हजार दिवस..”, शरद पवारांचा सवाल
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

याचबरोबर “जावेद अख्तर यांचं अभिनंदन मीच कशाला संपूर्ण देशाने केलं पाहिजे. जावेद अख्तर यांचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही करायला पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर निवडणुकीच्या अगोदर जो काय प्रकार झाला, त्यानंतर भाजपाच्या लोकांनी अनेक ठिकाणी फटाके वाजवले. जणूकाही पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट झाला. आम्हालाही आनंद झाला. पण ज्या पद्धतीने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर पाकिस्तानची धुलाई केली. याला एक हिंमत लागते, धाडस लागतं. म्हणून भाजपाने आणि या देशातील सर्वच राजकीय पक्षाने सुद्धा त्यांच्या हिंमतीला दाद देऊन, त्यांचं अभिनंदन करणं आपले कर्तव्य आहे असं आम्ही मानतो आणि ते आम्ही केलं.” असंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा – “पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तरांप्रमाणे हिंमत दाखवावी, ५६ इंचांची छाती काय…” ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा!

याशिवाय “आम्ही प्रत्यक्ष बोलूनही केलं आणि आज सामनाच्या माध्यमातूनही हा विषय आम्ही समोर आणला. जावेद अख्तर असतील किंवा अन्य कोणी असतील, यांच्यावर भाजपाने सातत्याने एका वेगळ्या पद्धतीने टीका केली. ते जेव्हा अनेकदा परखड भूमिका मांडायला लागले तेव्हा त्यांना पाकिस्तानात चालते व्हा किंवा ते देशद्रोही आहेत असं म्हटलं गेलं. कारण, त्यांचा धर्म मुसलमान आहे. पण त्याच जावेद अख्तर यांनी एक साहित्यिक, लेखक, कवी म्हणून जाऊन लाहोरमध्ये फैज महोत्सवात त्यांना सुनावलं.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.