राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांना १२ आमदार व ऑक्टोबरमध्ये सरकार अस्थिर करण्यासंदर्भात लिहिलेल्या लेखावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकास आघाडीच्या डिक्शनरीत नाहीत, राऊतांचं फडणवीसांना उत्तर

“देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे. पण अंतर्विरोध काय, तर आंतरपाटही नाहीये. आम्ही वरमाला घातल्या आहेत, आमच्यात कोणताही आंतरपाट नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील तीन प्रमुख पक्षांनी बनवलेलं आहे. ही खिचडी नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. काल शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यांनीही ठाम विश्वास व्यक्त केला आहे की, हे सरकार पाच वर्ष काम करेल,” असं राऊत म्हणाले.

आणखी वाचा- “अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले असं नाही…;” त्या प्रकरणावर संजय राऊताचं उत्तर

“राज्य चालवताना अनेक प्रसंग येतात. पहिल्यांदाच बदल्यांना स्थगिती दिलेली नाही. काही माध्यमे म्हणतात मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. काही म्हणतात गृहमंत्र्यांनी स्थगिती दिली. कुणी स्थगिती दिली हे आधी ठरवा, मग मी उत्तर देईल. बदल्यांसंदर्भात मुख्यमंत्री अंधारात नव्हते. नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले.

आणखी वाचा- काही लोक महाविकास आघाडीत वाद होण्याची वाट बघत आहेत – बाळासाहेब थोरात

“१५जूनला राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची मुदत संपलेली आहे. घटना पाळत असू, जी देव व धर्मापेक्षा महत्त्वाची आहे, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. त्या बाळासाहेब ठाकरे यांचा मी चेला आहे. मला असं वाटत हा देश आणि राज्य घटनेनुसार चालावं. घटनेनं जे अधिकार लोकनियुक्त सरकारला दिले आहेत. घटनेनं जे अधिकार संसदेला आणि दोन्ही सभागृहांना दिले आहेत. त्या अधिकारांचं हनन होऊ नये. ते अधिकार पायदळी तुडवून नये. जी परंपरा आहे, ती पुढे चालू राहावी, त्यासंदर्भात आघाडी सरकार व राज्यपालांमध्ये चर्चा सुरू आहे. मला जे वाटत. जे दिसत ते मी लिहितो. माध्यमांना असं षडयंत्र दिसत असेल तर समोर आणावं,” असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on 12 mlc appointment by governor bmh
First published on: 07-07-2020 at 14:38 IST