छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात राडा झाला आहे. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर परिसरातील किराडपुरा भागातील राममंदिराजवळ दोन गटात वाद झाला. काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांना आग लावली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर येथील हिंसाचाराची घटना ताजी असताना पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील काही भागातही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रामनवमी निमित्त काढलेल्या प्रभू रामचंद्राच्या मिरवणुकीदरम्यान, कोलकात्यातील हावडा परिसरात हिंसाचार घडला. यावेळी काही समाजकंठकांनी अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी केली.

हेही वाचा- संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक

विशेष म्हणजे सध्या रामजान सुरू असल्याने रामनवमीची मिरवणूक शांततेत काढावी. मस्लीमबहुल भागातून मिरवणूक काढू नये. चिथावणी देऊ नये, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. असं असूनही हावडा परिसरात हिंसाचाराची घटना घडली.

हेही वाचा- VIDEO: पश्चिम बंगालमध्ये रामनवमी सणाला गालबोट, अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी

या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “या सगळ्या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात ‘तर्क-वितर्क’ लावले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on ramnavami violence in sambhajinagar west bengal and gujarat rmm
First published on: 30-03-2023 at 23:12 IST