गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी चंद्रपूरला आणण्यात येईल. धानोरकरांच्या निधनाचं वृत्त कळताच राज्यासह देशभरातील नेते मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील आज (३० मे) पत्रकार परिषदेवेळी धानोरकरांच्या आठवणींना उजाळा दिला.

खासदार संजय राऊत म्हणाले, बाळू धानोरकरांच्या निधनाचा धक्का केवळ काँग्रेसलाच नाही तर शिवेसनेलासुद्धा बसला आहे. धानोरकर हे आमचे एके काळचे सहकारी आणि मित्र. मी आज दुपारी दिल्लीला पोहोचणार होतो, पण मी सकाळीच मुद्दाम आलो होतो. कारण धानोरकरांची प्रकृती कशी आहे ते पाहायला रुग्णालयात जायचं होतं. बाळू धानोरकर हे मुळचे शिवसैनिक. शाखाप्रमुख पदापासून ते तालुका अध्यक्ष, जिल्हाप्रमुख पदापासून ते खासदार झाले. एकदा विधानसभा लढले तेव्हा थोडक्यात त्यांचा पराभव झाला. मग परत लढले आणि विजयी झाले.

हे ही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या गाठीभेटी वाढण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत म्हणाले, धानोरकर यांना शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढायची होती. त्यांना उद्धवजी ठाकरे यांनी तयारी करण्याच्या सूचना आणि पवानगी दिली होती. परतु त्यांना शिवसेनेकडून लढता आलं नाही, युतीकडून लढता आलं नाही. ऐनवेळेस ते काँग्रेसमध्ये जाऊन लोकसभा निवडणूक लढले. ते राज्यातले काँग्रसेचे एकमेव खासदार होते. जरी ते काँग्रसमध्ये गेले, काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार असले तरी त्यांची जीवनशैली, त्यांचं वागणं हे शिवसेनेचं होतं. शिवसैनिक असल्याचा त्यांना शेवटपर्यंत सार्थ अभिमान होता. ते काँग्रेसकडून निवडून आले असले तरी ते शिवसेनेचे होते.