शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावमधील सभा यशस्वी झाली. या सभेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. या टीकेला आता शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरे आम्हाला गद्दार म्हणत आहेत. परंतु यांनीच हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे.”

संजय शिरसाट म्हणाले की, “२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपाने हिंदुत्वाच्या विचारांसह निवडणूक लढवली. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली. दुसरीकडे महाविकास आघाडीत राहणं ही उद्धव ठाकरे यांची आता मजबुरी झाली आहे. शिरसाट म्हणाले की, महाविकास आघाडीची आजची बैठक तुम्ही पाहिली असेल. त्यात महाविकास आघाडीचे किती नेते होते? त्यांचं शर्ट पकडून चालायची उद्धव ठाकरे गटाची मजबुरी आहे.”

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

शिरसाट म्हणाले की, “ठाकरे गटाने बैठका आणि सभांची तयारी करायची आणि त्यांच्या (काँग्रेस-राष्ट्रवादी) नेत्यांनी तिथे जाऊन भाषणं ठोकायची, असं सगळं सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे संपर्कात असल्याच्या चर्चांबाबत टीव्ही ९ मराठीने विचारल्यानंतर शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटाचे आमदार आणि नेते संपर्कात आहेत. काही दिवस वाट पाहा, कळेल तुम्हाला सर्वकाही. लोकांच्या मनात जे आहे ते कळेलच. त्यामुळे पुन्हा म्हणू नका गेले ते गद्दार आणि राष्ट्रवादीतून आलेले सोन्यासारखे, अगदी हिऱ्यासारखे.”

हे ही वाचा >> “पुन्हा म्हणू नका…”; संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले, “ज्याने खोके घेतले…”

“शिवसैनिकांसाठी रेड कार्पेट अंथरा”

उद्धव ठाकरे यांना सल्ला देत शिरसाट म्हणाले की, “रेड कार्पेट शिवसैनिकांसाठी अंथरा. ज्या शिवसैनिकांनी त्यांच्या रक्ताने शिवसेना वाढवली, मोठी केली त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरा, राष्ट्रवादीच्या लोकांसाठी नको.”