ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात भर बैठकीत जोरदार राडा झाला आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते आपसात भिडले. दोन नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ समोर आला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले.

या घटनेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी आक्रमक झालं किंवा अंगावर धावून आलं तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

हेही वाचा- “…तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही”, जयंत पाटलांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदाराला निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही.”

हेही वाचा- भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा; थेट अंगावर गेले धावून, नेमकं कारण काय?

नेमकं काय घडलं?

संबंधित बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती देताना संजय शिरसाट पुढे म्हणाले, “कन्नडच्या आमदाराने प्रश्न उपस्थित केला की, माझ्या मतदारसंघात एकही पैसा दिला नाही. यावर पालकमंत्र्यांनी सांगितलं की, जिल्हाधिकाऱ्यांकडून तुम्हाला त्यावर लेखी उत्तर मिळेल. तरी त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला. एखादा सदस्य असा गोंधळ घालत असेल तर त्याला पालकमंत्री उत्तर देतील, ते साहजिकच आहे. तुम्ही सभागृहात असं वर्तन करत असाल तर पालकमंत्र्यांना राग येणं, साहजिक आहे. त्याला तुम्ही बाचाबाची म्हणत असाल तर ठीक आहे, पण सदस्याचं असं वर्तन योग्य नाही.”