सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत इतर मागासवर्गीयांवर (ओबीसी) अन्याय होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राखीव जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची मागणी साताऱ्यातील उत्तर कोरेगाव भागातील वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मराठा समाजातील अनेकांनी कुणबी दाखले घेतले आहेत. यामुळे अनेक जण ओबीसी आरक्षण असलेल्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे ओबीसी राजकारण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगाड्यात आजही ओबीसी समाज दुय्यम स्थानी आहे. या निवडणुकीत ओबीसींनी आपली ताकद न दाखवल्यास त्यांना हक्काची राजकीय पदेही मिळणार नाहीत, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम म्हणाले, स्थानिक ओबीसी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमणाचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. बाहेरून येऊन प्रमाणपत्राच्या आधारे सत्ता समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाठार स्टेशन गटातील जनता कधीच स्वीकारणार नाही. भूमिपुत्रांचे हक्क हेच आमचे प्राधान्य असणार आहे. वाठार स्टेशन गटाचे राजकारण भूमिपुत्रांचे आहे. समाजाच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या प्रमाणपत्र बाजारावर कडक भूमिका घेण्याची हीच वेळ आहे. जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असा सर्वपक्षीय निर्धार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभय तावरे, रासपचे नेते भाऊसाहेब वाघ, बाजार समितीचे माजी संचालक शांताराम दोडके, मुस्लिम नेते हमीद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजातील अनेकांनी कुणबी दाखले घेतले आहेत. यामुळे अनेक जण ओबीसी आरक्षण असलेल्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे ओबीसी राजकारण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगाड्यात आजही ओबीसी समाज दुय्यम स्थानी आहे. या निवडणुकीत ओबीसींनी आपली ताकद न दाखवल्यास त्यांना हक्काची राजकीय पदेही मिळणार नाहीत, असे आवळे यांनी सांगितले. कदम म्हणाले, स्थानिक ओबीसी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमणाचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. बाहेरून येऊन प्रमाणपत्राच्या आधारे सत्ता समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाठार स्टेशन गटातील जनता कधीच स्वीकारणार नाही. भूमिपुत्रांचे हक्क हेच आमचे प्राधान्य असणार आहे.