सातारा : त्यांना देवेंद्र फडणवीस पावले. नाहीतर आता कारागृहात गेला असता. आता तरी बदला, नीट वागा, असे म्हणत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. फलटण येथील मेळाव्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलत होते.
असत्य, कट-कारस्थानाचा आनंद तात्पुरता असतो. शकुनी मामांनी कट-कारस्थानातून दुर्योधनाच्या अंताचा असुरी आनंद घेतला. तशाच प्रकारचा असुरी आनंद जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर, तसेच गाळेधारकांवर अन्याय करत असताना ते घेत होते. मात्र, त्यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय त्यांनी धरले आहेत हे मला माहिती असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले.
परमेश्वराच्या रूपाने आपणाला देवेंद्र फडणवीस पावले. मी माफ केलं म्हणून कारागृहात बसायचे वाचलात, त्याची जाणीव ठेवा. आता तरी बदला, नीट वागा, चुकीचे वागलात तर ते तुम्हालाच फेडावे लागणार आहे, हेही ध्यानात ठेवा, अशी टीका गोरे यांनी रामराजेंवर केली.
कट-कारस्थान जास्त दिवस टिकत नाही. हा आनंद जास्त दिवस नसतो, तात्पुरता असतो. माझ्यावर २९ गुन्हे दाखल झाले, तरी मान वाकवली नाही. कोणाच्या दारात कधी गेलो नाही, असे गोरे म्हणाले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी रचलेला डाव त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहिती असल्याचे गोरे म्हणाले. तुमच्या दारासमोर पोलीस उभा राहिल्याचेदेखील गोरे म्हणाले.