वाई: जागतिक वारसा स्थळ व आपल्या रंगीबेरंगी सौंदर्याने प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर मान्सून पूर्व पावसाने हिरवी चादर पसरली आहे. पठाराच्या संरक्षणासाठी कास पठार कार्यकारी समिती मार्फत तंगूसाची जाळी बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पठारावर यापूर्वी लोखंडी जाळी होती पण पर्यावरण दृष्ट्या कासच्या फुलांना धोका बसू लागल्याने तसेच पठारावरील वन्यप्राण्यांच्या आवास तसेच अधिवासात येणारा अडथळे लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी ही जाळी प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली. या जाळीमुळे पठारावरील फुले ही कमी झाल्याची ओरड होत होती. त्यामुळे संपूर्ण लोखंडी जाळी काढण्यात आली. तरीही शेकडो हेक्टर पठारावर आगामी हंगामाच्या दृष्टीने हजारो पर्यटकांना नियंत्रित करणे अवघड काम असल्याने तात्पुरती तंगूसाची जाळी फुलांच्या हंगामाच्या काळात बसवण्यात येते. जुलै महिन्यापासून कासवर छोटीमोठी फुलांची दुनिया बहरण्यास सुरुवात होईल. आगामी हंगामाच्या दृष्टीने छोटीमोठी कामे कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास समिती मार्फत सुरू करण्यात आली आहेत.

हेही वाचा – सांगली : कॉंग्रेसच्या एकजुटीत खडे टाकणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली – विश्वजित कदम

हेही वाचा – सोलापुरात जातीय दंगल घडविण्याचा भाजपवाल्याचा डाव होता, खासदार प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कासचा फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर कासवर पर्यटकांचा लोंढा वाढतो. पर्यटक फोटो काढण्यासाठी फुलांमध्ये कसेही घुसून नासधूस करतात. फुलांना उपद्रव होवू नये तसेच त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून जाळी बसवली जात आहे. – सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती