वाई: पुणे बंगळुरू महामार्गावर अनवडी (ता वाई) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. मंदार रामचंद्र कोल्हटकर (वय् ४४, मंगळवार पेठ सातारा) व धीरज बाळासाहेब पाटील (मुळगाव वाळवा सध्या राहणार सातारा) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही एका वर्तमानपत्राचे वितरण विभागाचे कर्मचारी होते.

हेही वाचा – माढ्यात महाविकास आघाडीविरुद्ध प्रा. लक्ष्मण हाके यांची बंडखोरी, महात्मा फुलेंच्या वेशभूषेत भरली उमेदवारी

uddhav Thackeray and varsha gaikwad
दलित असल्याने वर्षा गायकवाडांची उमेदवारी ठाकरे गटाने नाकारली? काँग्रेसच्या माजी नेत्याचा दावा
PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
Laxman Hake, Mahavikas Aghadi,
माढ्यात महाविकास आघाडीविरुद्ध प्रा. लक्ष्मण हाके यांची बंडखोरी, महात्मा फुलेंच्या वेशभूषेत भरली उमेदवारी

खंडाळ्याकडून साताऱ्याला येत असताना हा अपघात झाला. महामार्गावर अनवडी गावच्या हद्दीत तीव्र उतारावर मागून आलेल्या भरधाव मोटारीने (एम एच ०९ डी एम ८१६६) दुचाकीला (एम एच ११ बीजी८८०६) मागून जोरदार धडक दिली. यामध्ये मंदार व धीरज हे दोघेही गाडीच्या पुढील भागावर आदळले व तेथून हवेत उडून पुन्हा दुभाजकावर पडल्याने गंभीर जखमी झाले.

हेही वाचा – सांगलीत कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेत मनोमिलन ?

मोटार चालक विजय पूनमचंद शह ( वय ७५, कोल्हापूर) यांनी जखमीला प्रथम कवठे येथे व नंतर एकाला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात व दुसऱ्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास हवालदार एकनाथ माने करीत आहेत.