साताऱयाच्या प्रियांका मंगेश मोहिते हिने बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. कर्नल नीरज राणा यांच्या नेतृत्त्वाखाली गेलेल्या संघातून तिने हे यश मिळवले. प्रियांकाला पदभ्रमणाची आणि नृत्याची विशेष आवड आहे. त्यातूनच पुढे तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला होता. त्याला बुधवारी सकाळी मूर्त रूप आले. गेल्या आठवड्यातच गिरीप्रेमीच्या गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे यांनी एव्हरेस्ट सर केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
साताऱयाच्या प्रियांका मोहितेकडून ‘एव्हरेस्ट’ला गवसणी!
साताऱयाच्या प्रियांका मंगेश मोहिते हिने बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.
First published on: 22-05-2013 at 05:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sataras priyanka mohite climbed mount everest