सावंतवाडी: तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना विविध प्रशासकीय माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयाने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. कार्यालयाच्या प्रांगणातच ‘QR कोड वाचनालय’ उभारण्यात आले असून, या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण ई-पुस्तके आणि माहिती QR कोड स्कॅन करून उपलब्ध करून देण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत नागरिकांना महसूल प्रश्नोत्तरे, रचना व कार्ये, तलाठी कामकाज मार्गदर्शिका, महसूल न्यायालय, गौण खनिज फेरफार, जणू धन महसूल, ऑनलाइन अर्ज १२/१३, वारस नोंदी आणि जन माहिती अधिकारी यांसारख्या विविध विषयांवरील ई-पुस्तके आणि मार्गदर्शिका एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक पुस्तकासाठी स्वतंत्र QR कोड दिला असून, स्मार्टफोनच्या मदतीने हा कोड स्कॅन करताच संबंधित ई-पुस्तक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर वाचता येणार आहे.

या अभिनव उपक्रमाचे संकल्पना व प्रसिद्धी तहसीलदार सावंतवाडी, श्रीधर पाटील यांनी केली आहे. यामुळे नागरिकांना कार्यालयात न येता किंवा कागदपत्रांच्या प्रती मिळवण्याची वाट न पाहता, आवश्यक ती माहिती तात्काळ प्राप्त करणे सोपे होणार आहे. हा उपक्रम प्रशासकीय पारदर्शकता आणि माहितीचा सुलभ प्रसार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या QR कोड वाचनालयामुळे वेळ आणि श्रम यांची बचत तर होईलच, पण त्याचबरोबर नागरिकांना महसूल विभागाच्या कामकाजाची सखोल माहिती घरबसल्या उपलब्ध होईल. हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठी एक आदर्श ठरू शकतो.