Maharashtra Budget Session Updates, 14 March 2023: महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे. आज शिंदे गटाकडून वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर महेश जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर शिंदे गटाची बाजू मांडली. यानंतर शेवट वरील मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना आधीच्या काही खटल्यांचा दाखला सर्वोच्च न्यायालयाला दिला. दरम्यान, यावेळी न्यायालयात घडलेल्या एका प्रसंगामुळे चांगलाच हशा पिकला!

सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुप्रीम कोर्ट व्यवस्थापनाकडून केलं जातं.

dy chandrachud voting appeal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मतदारांना मराठीतून आवाहन; म्हणाले, “या खेपेला…”
Supreme Court asks poll panel about penalties for EVM manipulation
घडयाळाचे काटे उलटे फिरवू नका! मतपेटीद्वारे गुप्त मतदानाच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
supreme court on right to live in clean environment
स्वच्छ पर्यावरण जगण्याचा अधिकार! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर
Live Updates

Marathi News Updates: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यभरातील इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

16:57 (IST) 14 Mar 2023
Old Pension Scheme: उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांवर टीकास्र

जुन्या पेन्शन योजने साठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे.. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी.. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठाम पणे ऊभी आहे. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.. मग फडणवीस मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे? जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे! - उद्धव ठाकरे

16:45 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: “..तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राहुल नार्वेकरांवर बंधनकारक असेल”, उल्हास बापटांनी सांगितला नियम!

उल्हास बापट म्हणतात, “निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा होता. कारण त्यांनी मूळ संघटनेचा विचार न करता…!”

वाचा सविस्तर

16:11 (IST) 14 Mar 2023
Maharashtra News Live: रामदास कदम यांचं अनिल परबांवर टीकास्र!

आतमध्येच टाकायचं असतं, तर मी ईडीला सांगितलं असतं की अनिल परबला आधी आत टाका. सदानंद कदमचा इथे काय संबंध येतो? मी आधीही सांगितलंय की अनिल परबनीच सदानंद कदमला फसवलं आहे. लाईटचं बिलही अनिल परब यांच्या नावावर आहे. सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवलं आहे. सदानंद कदम यांचा काहीही संबंध नसेल, तर नक्कीच ते बाहेर पडतील. यात अनिल परबचीच सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे - रामदास कदम

15:54 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: कोर्टाची आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुनावणी होणार

शिंदे गटाकडून मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपला असून आता तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू होईल. ११ ते १२ तुषार मेहता बाजू मांडणार असून त्यानंतर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी रिजॉइंडर सादर करतील.

15:47 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सरन्यायाधीशांची मिश्किल टिप्पणी!

शिंदे गटाच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाने "तुम्ही आजच युक्तिवाद संपवणार आहात की उद्याही तुम्हाला वेळ हवाय?" अशी विचारणा केली. त्यावर वकील मनिंदर सिंग यांनी "मी आजच माझा युक्तिवाद संपवतोय. न्यायमूर्तींनी आत्तापर्यंत खूप पेशन्स दाखवले आहेत. मी अजून वेळ घेणार नाही", असं म्हणताच त्यावर न्यायाधीशांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे न्यायालयात हशा पिकला. "आम्ही एवढं सगळं ऐकून इथपर्यंत आलोय, त्यामुळे तुम्ही युक्तिवाद चालू ठेवा, आम्ही ऐकू" असं न्यायाधीश म्हणाले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635586325792563201

15:36 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: पक्षशिस्तीच्या नावाखाली आमदारांना अधिकार नाकारला जाऊ शकतो का? - मनिंदर सिंग

एका निर्वाचित सदस्याचा एक अधिकार हाही असतो की तो त्याच्या पक्षाविरोधात जर गरज पडल्यास बोलू शकतो. फक्त पक्षशिस्त किंवा पक्षाला सहन करावी लागणाऱ्या नाचक्कीच्या नावाखाली हा अधिकार नाकारता येऊ शकतो का? - शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा सर्वोच्च न्यायालयात सवाल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635582464784748544

15:31 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: मनिंदर सिंग यांच्याकडून अपात्रता नोटीसचा उल्लेख...

शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी दिला अपात्रता नोटीसचा दाखला...

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635581432172281856

15:20 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: मनिंदर सिंग यांनी मागील निकालांचे दिले संदर्भ...

शिंदे गटाकडून बाजू मांडताना वकील मनिंदर सिंग यांनी नबम रेबिया, किहितो आणि इतर दोन प्रकरणे आणि त्यातील निकालांचे संदर्भ आपल्या युक्तिवादात दिले...

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635578580150403072

15:17 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: महेश जेठमलानींचा युक्तिवाद संपला

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचा युक्तिवाद संपला असून आता शिंदे गटाकडून मनिंदर सिंग बाजू मांडत आहेत.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635578038267314177

15:17 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: बहुमताचं तत्व सर्वात महत्त्वाचं असतं - महेश जेठमलानी

बहुमताचं तत्व हे सर्वात महत्त्वाचं असतं. अपात्रतेच्या मुद्द्यापेक्षाही ते महत्त्वाचं असतं. यासंदर्भात अनेक निकाल आहेत न्यायालयाचे. त्यामुळेच राज्यपाल असं सरकार स्थापन करतात, ज्याचं नेतृत्व बहुमताचा विश्वास असणारी व्यक्ती करत असते - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635576272540811264

15:12 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

बहुमत गमावल्याचं उद्धव ठाकरेंना माहिती होतं. म्हणून त्यांनी राजीनामा दिला - जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635576799387324417

15:09 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: अपात्रता नोटीसचा क्रमांक आजपर्यंत शिंदे गटाला माहिती नाही - जेठमलानी

२९ जून रोजी सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीदरम्यानही त्यांनी १६ आमदारांच्याच अपात्रतेचा उल्लेख केला. आजपर्यंत अपात्रता नोटीसचा क्रमांक शिंदे गटाला माहिती नाही. ही नोटीस थेट विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठवण्यात आली होती असं सांगितलं जातं. ती आम्हाला कधीच मिळाली नाही - महेश जेठमलानी

15:05 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: फोडा आणि राज्य करा, याप्रमाणे फक्त १६ आमदारांना नोटीस - जेठमलानी

फोडा आणि राज्य करा या उक्तीप्रमाणे फक्त १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. त्यावर उत्तर देण्यासाठी फक्त दोनच दिवस देण्यात आले. नंतर आमदारांना मुंबईत येण्यापासून रोखण्यात आलं. धमक्या देण्यात आल्या. घरं जाळण्यात आली - महेश जेठमलानींचा युक्तिवाद

15:03 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

आमदारांना धमकी वगैरे गोष्टी आधीच सांगून झाल्या आहेत. त्या आम्ही वाचल्या आहेत - सर्वोच्च न्यायालय

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635575188933984256

15:03 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला जाहीरपणे धमक्या देण्यात आल्या - जेठमलानी

शिंदे गटाच्या कुटुंबीयांना असेणारी सुरक्षा काढून घेण्यात आली. जाहीरपणे उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणत होते की शिंदे गट मुंबईत आल्यानंतर त्यांची शरीरं थेट स्मशानभूमीत जातील अशी धमकी देण्यात आली. तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळण्यात आलं - महेश जेठमलानी

15:00 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: अध्यक्षांनी सदस्याला पुरेसा वेळ द्यायला हवा - महेश जेठमलानी

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी सदस्याला पुरेसा वेळ द्यायला हवा. नबम रेबियाचं उल्लंघन करून अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली. त्यापुढे जाऊन आम्हाला उत्तर देण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला. आम्हाला न्यायालयात येण्यापासून रोखण्यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात आले - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635573808500449280

14:46 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: "शिंदे गटात फूट पाडायची होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीपासून फक्त...", महेश जेठमलानींचा मोठा दावा!

कोणत्याही चर्चेमध्ये त्या १६ आमदारांव्यतिरिक्त उरलेल्या २३ आमदारांचा उल्लेख नव्हता. कारण त्यांना या गटामध्ये फूट पाडायची होती. शेवटच्या मिनिटापर्यंत ते फक्त १६ आमदारांबद्दलच बोलत राहिले. नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरच त्यांनी ३९ आमदारांचा उल्लेख करायला सुरुवात केली - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635572844586479622

14:44 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: २५ जूनला उपाध्यक्षांनी १६ आमदारांनाच नोटीस बजावली - जेठमलानी

२५ जूनला उपाध्यक्षांनी समन्स बजावले. ३९ आमदार होते असं आत्तापर्यंत आपण ऐकलं. पण २५ जूनला उपाध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात १६ आमदारांनाच समन्स बजावलं. - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635570081215414275

14:42 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: महेश जेठमलांनींंनी पुन्हा दिला नबम रेबिया प्रकरणाचा दाखला..

महेश जेठमलांनींंनी पुन्हा दिला नबम रेबिया प्रकरणाचा दाखला..

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635566900452429824

14:35 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: कलम १७९ अ आणि कलम १८१ अ चा देण्यात आला दाखला

महेश जेठमलांनींकडून कलम १७९ अ आणि कलम १८१ अ चा देण्यात आला दाखला...

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635566649234591746

14:33 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: व्हीपबाबत महेश जेठमलानींचा युक्तिवाद

व्हीप सभागृहातल्या आदेश उल्लंघनासंदर्भातच लागू होऊ शकतो, सभागृहाबाहेरच्या कृतीसाठी लागू होऊ शकत नाही - महेश जेठमलानी

14:31 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: १४ दिवसांची नोटीस आणि आमदारांची अपात्रता

अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात आमदारांना १४ दिवसांची नोटीस देणं बंधनकारक होतं - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635566198225244160

14:30 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटाचा व्हीप बेकायदेशीर होता, कारण... - महेश जेठमलानी

२१ आणि २२ तारखेचे मंजूर प्रस्ताव बेकायदेशीर होते. कारण २१ जून रोजीच सुनील प्रभूंना एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ गटानं पदावरून काढलं होतं. पक्षाचा व्हीप हा फक्त विधिमंडळ सभागृहातल्या कामकाजासाठी बजावला जाऊ शकतो, सभागृहाबाहेरच्या कामासाठी नाही - महेश जेठमलानी

14:28 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: केनियाच्या न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाला सदिच्छा भेट

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असताना केनियाच्या महिला सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाला भेट दिली.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635563317577281537

14:24 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: आधीच्या अध्यक्षांनी घटनात्मक कर्तव्यांचं उल्लंघन केलं - जेठमलानी

आधीच्या विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांचं उल्लंघन केलं. अध्यक्षांनी पारदर्शी असणं गरजेचं आहे - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635544844172140544

14:21 (IST) 14 Mar 2023
“…तर एकनाथ शिंदेंचं सरकार कोसळेल”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडलं गणित; म्हणाले, “जेव्हा राजकीय पक्षांना…!”

“जेव्हा राजकीय पक्षांना योग्य पद्धतीने न्यायालाय धरून वागणं जमत नाही, तेव्हा आपण…!”

वाचा सविस्तर

13:03 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: लंच ब्रेकनंतर सुनावणी चालू राहणार

सर्वोच्च न्यायालयात लंच ब्रेक झाला असून लंच ब्रेकनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू राहणार आहे. सध्या शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करत आहेत.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635543275422756865

13:01 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी कोणताही संवाद साधला नाही - जेठमलानी

एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करताना किंवा इतर आमदारांवर कारवाई करताना उद्धव ठाकरेंनी कोणताही संवाद साधला नाही - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635541990975873024

12:54 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : महेश जेठमलानींनी महाराष्ट्र विधिमंडळ नियमांचं केलं वाचन

महेश जेठमलानींनी महाराष्ट्र विधिमंडळ नियमांचं केलं वाचन

12:52 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis :

३४ आमदारांनी शिंदेंना विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त केलं. भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून निवड केली. याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली होती. राज्यपालांनीही त्याचा स्वीकार केला. याबाबत उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार सचिवांना ईमेलवर माहिती देण्यात आली होती - महेश जेठमलानी

12:51 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis :

एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना शिंदेंच्या गटनेतेपदावरून हकालपट्टीचा निर्णय माध्यमांकडून समजला - महेश जेठमलानी

12:50 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : २१ जूनलाच शिंदेंची पदावरून हकालपट्टी केली - जेठमलानी

२१ जून रोजी ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे कारवाईनंतर त्यावर काहीही करता येणं शक्य राहिलं नाही, चर्चा होणं शक्य झालं नाही महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635541990975873024

12:48 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : २१ जूनमन ते ४ जुलै या काळात सगळ्या घडामोडी घडल्या - महेश जेठमलानी

अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेऊन न्यायालयाने सर्व घटनाक्रम उलट फिरवावा अशी मागणी केली गेली. २१ जून ते ४ जुलै या कालावधीत सगळ्या घडामोडी घडल्या. २१ जुलैला सर्वात आधी मतभेदांचा मुद्दा समोर आला. मविआ आघाडी पक्षाचं नुकसान करत असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं होतं. मविआमुळे मतदारांचा विश्वासघात झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं - महेश जेठमलानी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635540532587003910

12:41 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: नीरज कौल यांचा युक्तिवाद संपला

शिंदे गटाच्या वतीने बाजू मांडणारे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद संपला. आता महेश जेठमलानी यांच्या युक्तिवादाला सुरुवात

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635539750332547073

12:36 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांनी अजून काय करायला हवं? - नीरज कौल

राज्यपाल फक्त त्यांच्याकडे आलेल्या माहिती किंवा पुराव्यांवरच निर्णय घेऊ शकतात. ते निवडणूक आयोगाप्रमाणे यामध्ये चौकशीचे आदेश देऊ शकत नाहीत. जर बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा काढला असेल, तर राज्यपालांसमोर पुराव्यांवर आधारित निर्णय घेण्याशिवाय अजून कोणता मार्ग राहातो? - नीरज कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635537299529428993

12:32 (IST) 14 Mar 2023
विश्लेषण : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीचा अंतिम टप्पा… कुठे, किती घरे उपलब्ध होणार?

म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची मागील एक-दीड वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षा आहे. आता मात्र कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. कोकण मंडळाने ४७५२ घरांसाठीच्या सोडतीची घोषणा केली आहे. म्हाडाच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण अशा ठिकाणी परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध झाली आहे.

सविस्तर वाचा...

12:31 (IST) 14 Mar 2023
विश्लेषण : सरकारी कर्मचारी संपाचा इतिहास काय? कर्मचाऱ्यांच्या पदरी पडलेले फायदे कोणते?

जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी शासकीय, निमशासकीय, जि.प., शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संपावर गेले आहेत. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. कर्मचारी संघटना आणि शासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संप किती काळ चालणार, याबाबत अनिश्चितता आहे. यापूर्वी झालेले सरकारी कर्मचाऱ्यांचे संप आणि त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पदरी पडलेला लाभ याचा घेतलेला आढावा.

सविस्तर वाचा...

12:31 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: उद्धव ठाकरेंना १० मिनिटांत राजीनामा दिला - नीरज कौल

उद्धव ठाकरेंना माहिती होतं की त्यांच्या कडे बहुमत नव्हतं. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव घेण्याच्या दिलेल्या अंतरिम आदेशानंतर १० मिनिटांत त्यांनी राजीनामा दिला - नीरज कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635536303533228032

12:30 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयात चुकीचं काय आहे? - कौल

राज्यपालांसमोर आलेल्या माहितीनुसार जर त्यांनी निर्णय घेतला असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? जर ४० हून जास्त सदस्यांनी सांगितलं की आमचा सरकारवर विश्वास नाही, तर सरकारकडे बहुमत नसल्याचं याहून चांगलं निदर्शक कुठलं असू शकतं? - नीरज कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635536040466468864

12:29 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis :

विधिंमडळ गट, ७ अपात्र आमदारांनी दावा केला की त्यांना आघाडी सरकारबाबत समस्या आहेत. आता राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा. जर हा निर्णय कोणत्याही कायद्याला धरून नसेल, तर त्यासंदर्भात न्यायालयात युक्तिवाद होऊ शकेल. पण कुणीतरी अविश्वासाबाबत राज्यपालांना सांगितलं, तरच त्यावर राज्यपाल निर्णय घेऊ शकतात, असं कुठल्या कायद्यात म्हटलंय? - कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635535566438825987

12:24 (IST) 14 Mar 2023
अकोल्यात शिवसेना वाढविण्याचे एकनाथ शिंदेंपुढे आव्हान, पक्षातील कलह विकोपाला

निधी वाटपावरून मतभेद झाल्याने अकोला शिवसेनेत नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. पक्षाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरूद्ध पदाधिकारी असा वाद रंगला आहे. पक्षातील कलह आता विकोपाला गेला. शिवसेनेला संघटनात्मक बळकटी येण्यापूर्वीच जिल्ह्यात पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत.

सविस्तर वाचा

12:23 (IST) 14 Mar 2023
वर्धा: खेळाडूंसाठी खुशखबर! अनिल कुंबळेच्या कंपनीचा 'ई चन्नावार' सोबत करार, अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार

प्रख्यात क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या टेनविक स्पोर्ट्स या कंपनीने येथील 'ई चन्नावार' संस्थेच्या अल्फा ड्रीम्स स्पोर्ट्स अकादमी या संस्थेशी करार करीत ग्रामीण भागात राष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार करण्याचा विडा उचलला आहे.

सविस्तर वाचा

12:21 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : अध्यक्षांच्या निर्णयावर दाद मागता येऊ शकते - नीरज कौल

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेवर घेतलेला निर्णय किंवा न घेतलेला निर्णय यावरही न्यायालयात दाद मागता येऊ शकते - नीरज कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635533854634278912

12:16 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाच्या वकिलांना सवाल

मग तुमच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष अपात्रतेसंदर्भात निर्णय घेत नाहीत, मग ते कितीही वर्षांपर्यंत असो, तोपर्यंत अपात्रतेवर युक्तिवाद केला जाऊ शकत नाही? - सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाच्या वकिलांना सवाल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635532371138342912

12:12 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis :

अपात्रतेसंदर्भात निर्णय होईपर्यंत ते अपात्र असल्याचं तुम्ही गृहीत कसं धरू शकता? त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे - नीरज कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635531807088336896

12:11 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: जरी अपात्र व्यक्तीने मतदान केलं, तरी त्याचं मत ग्राह्य धरलं जातं - नीरज कौल

जरी अपात्र व्यक्तीने मतदान केलं, तरी त्याचं मत ग्राह्य धरलं जातं - नीरज कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635531097105915904

12:09 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालय असं म्हणू शकतं का की... - नीरज कौल

आज सर्वोच्च न्यायालय इतर सर्व घटनात्मक संस्थांना बाजूला सारून असं म्हणू शकतं का की आम्ही या सर्व बाबींवर निर्णय घेणार? - नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात सवाल, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर मांडली बाजू

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635530244336816129

12:04 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : न्यायमूर्ती नरसिम्हा यांचा नीरज कौल यांना सवाल

ही पक्षांतर्गत फूट नाही, तुम्हाला दहाव्या परिशिष्टाचं संरक्षण आहे असं विधानसभा अध्यक्ष ठरवू शकतात का? - न्यायमूर्ती नरसिम्हा

12:02 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद

आमचा पक्षच मूळ शिवसेना आहे. विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष हे दोन्ही एकमेकांशी अंतर्गत जोडलेले आहेत - शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635529122666663936

12:01 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: विधानसभा अध्यक्ष हे ठरवू शकत नाही - कौल

निवडणूक आयोगाकडे पक्ष कोणता हे ठरवण्याचे अधिकार आणि यंत्रणा आहे. विधानसभा अध्यक्ष त्यावर निर्णय घेऊ शकत नाही - कौल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635527833266307072

Maharashtra Live GIF

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi News: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यभरातील इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!