नव्या शैक्षणिक वर्षाला आज सुरुवात होत असताना करोना पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामकाज कसे सुरू होणार याकडे शिक्षण जगताचे लक्ष वेधले होते. विद्यार्थी-पालक यांनाही याविषयी कुतूहल निर्माण झाले होते. मात्र करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश सोमवारी शाळांना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी शाळेचा पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये हजेरी लावली.  मात्र शिक्षण विभागाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शैक्षणिक कामकाज करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. ‘गेले दोन ते तीन महिने कोविंड १९ या भयानक संकटाशी जग लढत आहे. अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, अधिकारी, नागरिक पालक, संस्था याच्याशी लढत आहेत.

अनेक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर सण २०२०-२१ या वर्षाचे शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु करण्यात येणार असल्याचे सूचित केले होते.अद्याप शासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात’, असे निर्देश कोल्हापूरचे माध्यमिक शाळा शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी परिपत्रकाद्वारे शाळांना कळवले आहे. याबाबत काही शंका अडचणी असतील तर तालुका उपशिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी शिक्षण यांच्याशी संपर्क साधावा असेही या पत्रात म्हटले आहे.

बाळगोपाळ घरीच
यामुळे शाळेचा पहिलाच दिवस कोणतेच शैक्षणिक कामकाज न होता पार पडला. अर्थात शाळा सुरू होण्या बद्दल सूचना नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळांकडे पाठ फिरवली होती. सर्व मुले घरातच राहत होती शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सुट्टी मिळाल्याचे आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School shut down next order nck
First published on: 15-06-2020 at 12:10 IST