सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. प्रवरा नदीत काल दोन तरुण बुडाले असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. या शोधकार्यादरम्यान एसडीआरएफची बोट उलटली आणि तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रवरा नदी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उकाड्याने त्रस्त झालेले अनेकजन या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहेत. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव मधील रोपवाटीके जवळील पात्रात दोन युवक पोहण्यासाठी प्रवरा नदीत उतरले होते. यावेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पोपट जेडगुले (वय २५), अर्जून रामदास जेडगुले (वय १८) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसडीआरएफची बोट उलटल्यानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “उजनी धरणात बोट बुडाल्याने बेपत्ता झालेल्या पाच जणांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुखःद आहे. तर नदीत बुडालेल्याचा शोध घेताना प्रवरा नदीत बोट उलटून SDRF च्या बचाव पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाल्याची बातमीही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. यातील सर्व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!”