कोल्हापूर  जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत, अशी  माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे यांनी दिली.  
   आटोळे म्हणाले,  भाताच्या  पिकावर धुळवाफ पेरणी झालेल्या पिकाची ऊगवण व वाढीच्या अवस्थेत आहे. काही  ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.  पिकासाठी  पावसाची अत्यंत आवश्यकता आहे.  लागण  भातासाठी रोपवाटिका तयार आहे.  सोयाबीन  ओलिताच्या सोयीनुसार सोयाबीन पिकाची पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. पेरणी  झालेल्या क्षेत्रावरील भुईमूग पीक वाढीच्या अवस्थेत आहे तर काही भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.  आडसाली  उसाची जोमदार वाढ होत असून खोडवा उसासाठी आंतरमशागतीची काम सुरू आहेत.  सुरू  व पूर्वहंगामी उसामध्ये खते देणे, पाणी  देणे व बांधणीची कामे सुरू आहेत.
   जिल्ह्यामध्ये २०  ते  २६  जून   या  कालावधीत ३९  हजार  ८८५  हेक्टर  क्षेत्रात तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे.  तसेच,  ३८ हजार  ७१०  हेक्टर  क्षेत्रावर खरीप भात,  खरीप  ज्वारी ३५४  हेक्टर,  नागली  ५९०  हेक्टर,  मका  १२५  हेक्टर,  इतर  तृणधान्ये १०६  हेक्टर,  तर  २६८  हेक्टर  पेर क्षेत्रामध्ये कडधान्याची पेरणीचे काम करण्यात आले आहे.  कडधान्यामध्ये   तूर १६८  हेक्टर,  मूग  १०२  हेक्टर,  उडीद  १२३  हेक्टर  आणि इतर कडधान्ये २६८  हेक्टर  अशी पेरणीची कामे झाली आहेत.  ८ हजार  ४०  हेक्टर  पेरक्षेत्रावर भुईमूग,  कारळा   ९१  हेक्टर,  सोयाबीन  ९  हजार,  २३३ हेक्टर ,  इतर  गळीत धान्ये १२  हेक्टर  अशी एकूण १७  हजार  ३७६  हेक्टर  गळीत धान्ये,  ताग,  चारा,  धेंच्या  १९८  हेक्टर  अशी पिके घेण्यात आल्याची माहिती आटोळे यांनी दिली.  याशिवाय  आडसाली उसाची ७२८  हेक्टरवर  लागवड करण्यात आली आहे, १ लाख  ४६  हजार  २९५  इतक्या  क्षेत्रावर गाळपासाठी उसाच्या पिकाची नोंद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
कोल्हापूरमध्ये हलका पाऊस; पाणीसाठे खालावले
जिल्हय़ात गेल्या चोवीस तासात तुरळक पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत सरासरी ०.७४ मि. मी. इतका पाऊस झाला असून आजअखेर सरासरी १३४.२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासामध्ये जिल्हय़ात एकूण ८.८८ मि.मी. पाऊस पडला असून १ जूनपासून एकूण १६१०.४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात ३.०० मि. मी., चंदगड तालुक्यात २.८३ मि. मी., शाहूवाडी तालुक्यात २.०५ मि. मी., तसेच राधानगरी आणि आजरा तालुक्यात प्रत्येकी ०.५० मि. मी. पाऊस झाला. जिल्हय़ात आज सकाळी ७ वाजता झालेल्या नोंदीनुसार धरणांच्या पाणीसाठय़ाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, राधानगरी ५७.९२ (२३६.७९), तुळशी २८.८६ (९८.२९), वारणा ३३१.३७ (९७४.१८), दूधगंगा १३५.७५ (७१९.१२), कासारी १९.६६ (७८.५६), कडवी ३११.९९ (७१.२४), कुंभी २१.९५ आजचा पाणीसाठा, पूर्णसंचय पाणीसाठा कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये आहेत.(७६.८८),पाटगाव ३१.५७ (१०५.२४),चिकोत्रा ८.३७ (४३.११),चित्री ७.७८ (५३.४१),जंगमहट्टी ८.८० (३४.६५),घटप्रभा ३१.३५ (४३.६५),जांबरे ०.४६ (२३.२३),कोदे ल. पा. १.७९(६.०६).आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी ७ फूट, सुर्वे १ फूट १० इंच, रुई ३२ फूट ९ इंच, तेरवाड २९ फूट, शिरोळ १९ फूट, नृसिंहवाडी १५ फूट आहे.