अलिबाग येथील पंचतारांकीत हॉटेल मध्ये चालणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने केलेल्या या कारवाईत पाच परदेशी महिलांसह नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. इंटरनेट साईटच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. अलिबाग शहर आणि जिल्ह्यातील परीसरात इंटरनेट साईटच्या माध्यमातून परदेशी मुली पुरवल्या जात असल्याच्या जाहिराती प्रसिध्द होत होत्या. स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. यावेळी संबधित व्यक्तीने आयसीआयसी बँकेतील एका खात्यावर रक्कम भरण्याची सुचना केली. हि रक्कम भरल्यानंतर तीन परदेशी मुलींना अलिबाग येथील पंचतारांकीत हॉटेल मध्ये पाठवण्यात आले. बोगस ग्राहक पाठवून पोलीसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. सुरवातीला पंचासमक्ष्य तीनही परदेशी मुलीं आणि त्यांच्याकडून ग्राहकांनी दिलेली रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. यानंतर मुलींची वाहतुक करणारया दोघांना अलिबाग आणि मुंबई परीसरातून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान सेक्स रॅकेटची मुख्य सुत्रधार असणारी महिला असून, ती मुंबईतील बांद्रा येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तीच्या बांद्रा येथील आलिशान फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी आणखिन दोन परदेशी महिला आढळून आल्या. त्यांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी चार जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात लंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९५६आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय दड विधानच्या विवीध कलमा आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पाचही परदेशी मुलींना सुधारगृहात ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. लवकरच सर्व मुलींना त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे.
इंटरनेट साईटच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. यासाठी लाखभर रुपयांचा रकमा ग्राहकांकडून उगाळल्या जात होत्या. यातील पन्नास टक्के रक्कम हि दलालांना तर पन्नास टक्के रक्कम हि या परदेशी मुलींना दिली जात होती. याच पध्दतीने या मुलींनी अलिबागसह, बँगलोर, चंदीगढ, बँगलोर, पुणे, हैदाबाद आणि दिल्ली येथेही वेश्याव्यवसाय केल्याची कबूली दिली आहे. सर्व मुली दक्षिण अमेरीका मधील कोलंबिया येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. प्रवासी व्हिस्यावर या सर्व जणी सध्या भारतात आल्या असून त्यांच्या पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी सध्या सुरु आहे. या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.