Shahaji Bapu Patil : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे आणि अमित शाह यांना भेटायचे, असा दावा मंगळवारी संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही यावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

शहाजी बापू पाटील यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या दाव्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मौलवीची वेशभूषा बघायला संजय राऊत स्वत: तिथे गेले होते का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Gulabrao Patil : “संजय राऊतांना दाढी येत नाही, म्हणून त्यांनी…” ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील ‘त्या’ आरोपाला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर!

नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील?

“संजय राऊत आता काहीही बोलायला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना भेटण्यासाठी मौलवीची वेशभूषा केली, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, हे बघायला संजय राऊत तिथे गेले होते का? याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं”, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

“संजय राऊत खोट्या बातम्या पसरवात”

पुढे बोलताना, “संजय राऊत आजकाल खोट्या बातम्या पसरवून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याद्वारे राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतू महाराष्ट्राची जनता याला बळी पडणार नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

विधानसभेच्या जागावाटपावर म्हणाले…

दरम्यान, यावेळी त्यांना विधानसभेत शिंदे गटाला किती जागा मिळतील, असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, “विधानसभेला शिंदे गटाला सन्मानजनक जागा मिळतील. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या जागा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करतील. याशिवाय विदर्भ आणि मराठावाड्यातही आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे”, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

हेही वाचा – “मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे”, खासदार संजय राऊतांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांनी नेमका काय दावा केल होता?

संजय राऊतांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. “माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याआधी वेश बदलून भेटत होते. एकनाथ शिंदे हे जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते. एकनाथ शिंदे हे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले असल्याची माहिती माझ्याकडे आहे. तेदेखील अमित शाह यांना भेटले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नाव बदलून आणि वेश बदलून गृहमंत्री अमित शाह यांना भेटतात. मात्र, त्यांना कोणीही विमानतळावर आडवत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेलं आहे. कारण तसं त्यांना विमानतळावरून सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी वापरलेले बोर्डींग तपासलं पाहिजे. तसेच त्यांच्याकडून हे ओळखपत्र जप्त केली पाहिजेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.