राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील चांगलेच चर्चेत आले. बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये असताना त्यांची एक ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यांनी केलेल्या ‘झाडी, डोंगार, हाटेल’ या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात ते त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर आज शहाजी पाटील यांनी पुन्हा एकदा या झाडी, डोंगारचा उल्लेख केला. माहिती तंत्रज्ञानाची शक्ती अभूतपूर्व आहे, याची प्रचिती मला चांगल्या प्रकारे आली; असे शहाजी पाटील म्हणाले आहेत.ते सांगलीत एका सभेमध्ये बोलत होते. तर याच सभेत सदाभाऊ खोत यांनीदेखील शहाजी पाटलांना उद्देशून मिश्किल टिप्पणी केली.

हेही वाचा >>> शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई!

“मोबाईलमुळे सगळा घोळ झाला. झाडी डोंगार मलेशिया, अमेरिका, रशियापर्यंत गेलं. माहिती तंत्रज्ञानाची शक्ती अभूतपूर्व आहे. याची प्रचिती तुम्हाला जेवढा आले त्याच्यापेक्षा हजार पटीने मला आली,” असे शहाजी पटील मिश्किलपणे म्हणाले.

हेही वाचा >>> “काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीर माफी मागावी,” औरंगाबाद शहराच्या नामकरणावर सपा आमदार रईस शेख यांची टीका

तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी झाडी, डोंगार, हाटेल या वक्तव्याचा संदर्भ देत शहाजी पाटील चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत असे सांगितले. “सरकार आपलं आहे. या सरकारमध्ये दोन माणसं निश्चितपणे लोकप्रिय आहेत. बापूंचं तर ओके आहे. बापू आमच्यावर थोडं लक्ष असू द्या. तुम्ही पहिल्या रांगेत आहात,” असे सदाभाऊ खोत मिश्किलपणे म्हणाले.

हेही वाचा >>> “…तेव्हाच जल्लोष करू,” औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर चंद्रकांत खैरेंचे शिंदे सरकारला आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आसाममधील गुवाहाटी येथे असताना शहाजी बापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला फोन करून तेथील परिस्थितीचं वर्णन केलं होतं. “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” अशा आशयाचा त्यांचा डायलॉग व्हायरल झाला होता. हा डायलॉग इतका व्हायरल झाला की अक्षरश: लोकांना या डायलॉगचे वेड लागले होते. एवढंच नाही तर या डायलॉगवर गाणं सुद्धा बनवण्यात आलं.