Shiv Sangram Chief Vinayak Mete Death शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

मेटेंच्या निधनामुळे धक्का

“आजच्या सकाळची सुरुवात ही अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाली आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी विनायक मेटेंच्या (vinayak mete) निधनाचे बातमी कळाली. त्यामुळे धक्काच बसला. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या मेटेंचा जन्म झाला. आपल्या लहान गावातून समाजाच्या हितासाठी भूमिका घेण्याचा निर्धार करुन एखादी व्यक्ती राज्य पातळीवर आपला प्रभाव कसा पाडतो याचे उदाहरण म्हणजे विनायक मेटे” असल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.

हेही वाचा- विनायक मेटेंचा अपघात की घातपात? ‘मराठा क्रांती मोर्चा’चा सवाल, अपघातानंतरच्या घडामोडींवर व्यक्त केला संशय!

मराठा आरक्षणाबाबत मेटे आग्रही

गेली अनेक वर्ष माझा त्यांच्याशी परिचय होता. शेतकरी आणि शेतीबद्दल त्यांच्या मनात आस्था होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांच्या संबंधी एक जनमत निर्माण करण्याची भूमिका मेटेंची होती. आर. आर पाटील मेटेंचे अत्यंत जवळचे सहकारी होते. आणि त्यामुळेच मेटेंनी राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं. मराठा आरक्षणासाठी त्यांची आग्रही भूमिका होती. तसेच मुंबईच्या समुद्रात शिवछत्रपतींचे अंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याचे व्रत त्यांनी घेतलं होते आणि त्यासाठी ते अखंडपणे काम करत असल्याचेही पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar expressed grief on vinayak mete car accident death news dpj
First published on: 14-08-2022 at 11:40 IST