काही राजकीय पक्षांचे घटक सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असं काम करत आहेत – शरद पवार

शरद पवार सध्या नाशिक दौऱ्यावर असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

sharad-pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ येथील मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, मारहाण करण्यात आली, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपने शनिवारी ‘अमरावती बंद‘ पुकारला. त्याला हिंसक वळण लागले. दोन्ही गट समोरा समोर आल्याने दंगल सदृश स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, महाराष्ट्रात काही संघटना अशा घटनांना खतपाणी घालतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं, हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना तीन, चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे. राज्य सरकार चांगलं काम करताना बंदचा निर्णय, नैराश्यातून सामाजिक शांततेला धक्का बसेल असं काम काही राजकीय पक्षांचे घटक करतायत हे दुर्दैवी आहे.

हेही वाचा – अमरावतीत तणावपूर्ण शांतता, इंटरनेट व संचारबंदी कायम ; ९० जण अटकेत, भाजपसह अनेक नेते स्थानबद्ध

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sharad pawar on amravati malegaon violence nashik press conference vsk

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या