महापुरुषांबद्दल केलेली आक्षेपार्ह विधान, सीमावादावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आक्षेपार्ह विधान, बेरोजगारी महागाई यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या ( १७ डिसेंबर ) महाविराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा काही तासांवर येऊन ठेपला असताना देखील त्याला पोलिसांची परवानगी मिळाली नव्हती. यावरून राजकारण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला परवानगी दिल्याची माहिती दिली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘एबीपी माझा’शी बोलताना शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी बोलताना सांगितलं होतं की, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. तेव्हा त्यांनी परवानगीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. या मोर्चासंबंधी लोकांत औत्सुक्य आणि राग आहे.”

हेही वाचा : ‘आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात’ झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांवर आशिष शेलार संतापले; म्हणाले “आता यांची मस्ती थेट…”

“राग याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आली. जबाबदार लोकांनी केलेली ही विधान सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल, हा मला विश्वास आहे,” असे शरद पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “बहुमताचा आकडा १८२पर्यंत जाणार, नव्या वर्षात…”, उदय सामंत यांचा मोठा दावा; म्हणाले, “खरा धमाका…”!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“या मोर्चाला परवानगी देण्यात पोलिसांना काहीच अडचण असण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी ठरलेल्या मार्गानुसार हा मोर्चा काढावा. तो शांततेच्या मार्गाने निघून कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.