नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा रविवारी ( २८ मे ) पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचं उद्घाटन केलं. पण, संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं आहे. याप्रकारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहे. नव्या संसद भवनाच्या बाहेर कुस्तीपटूंनी ‘महापंचायत’ असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू नव्या संसद भवनाकडे निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

“दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी…”

यावर शरद पवार यांनी ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे. “लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “विनेश तू तर माझ्या कुटुंबातीलच…”, काँग्रेसने शेअर केला पंतप्रधानांचा ‘तो’ जुना व्हिडीओ

“केंद्रीय गृहमंत्रालयाने आंदोलकांना मारण्यास…”

या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी सरकारला सवाल विचारला आहे. ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ऑलम्पिक विजेत्या खेळाडूंना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खूप निराश झालो आहोत. साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्याशी झालेलं गैरवर्तन निंदणीय आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आंदोलकांना मारण्यास परवानगी दिली होती का? यांचं केंद्र सरकारने उत्तर द्यावं.”

हेही वाचा : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही साक्षी मलिकचा ठाम निर्धार, म्हणाली, “सुटून आल्यानंतर…”

“आता न्याय मागणारे खलनायक आहेत का?”

“ज्या खेळाडूंनी आपल्या देशाला खेळाच्या माध्यमातून सन्मान मिळवून दिला, अशा खेळाडूंना न्यायासाठी लढाई करावी लागत आहे, हे खरोखरच दुर्दैवी आहे. ज्या खेळाडूंचा विजयानंतर सर्वांनी सत्कार केला. मग आता न्याय मागणारे खलनायक आहेत का?,” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.