देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासारखं वाटत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्तेत आलेल्या ‘शिंदे सरकार’संदर्भात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

नक्की वाचा >> “आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे…” शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट

“एक स्थानिक बाब आहे, आत्ताचे मुख्यमंत्री आङेत ते मुळ साताऱ्याचे आहेत. योगायोग असा आहे की राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचे होते. मी पण मुळ कोरेगाव तालुक्याचा होतो. बाबसाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता ज्यांनी शपध घेतली ते साताऱ्याचे आहेत,” असं म्हणत शरद पवारांनी शिंदेच्या सातारा कनेक्शनचा उल्लेख केला.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…

पुढे बोलताना पवार यांनी, “मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचे सर्व विभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी,” असं मतबोलुन दाखवलं. एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात बोलताना हे महाविकास आघाडीचं अपयश असल्यासारखं वाटतं नाही असं पवार म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> मोदींचा फोन, फडणवीस अन् उपमुख्यमंत्रीपद; शपथविधीच्या काही मिनिटं आधी नेमकं घडलं काय?

“महाविकास आघाडी म्हणून कुठे कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे हे त्यांच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. एवढ्या लोकांना बाहेर नेण्याची हिंमत दाखवली यातच त्यांचे यश आहे,” असं पवार शिंदेंच्या बंडाबद्दल बोलताना म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात असल्याबद्दल विचारण्यात आलं असता, “माझ्या मते त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एकदा विश्वास टाकला की पूर्ण जबाबादारी द्यायची. विधीमंडळाची पुर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी दिली होती. ज्या वेळेला ३९ लोकं राज्याच्या बाहेर जातात त्यात दुरुस्त करायला स्कोप राहत नाही,” असं पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अगदी ऐनवेळी घेतल्यासंदर्भात भाष्य करताना पवारांनी, “फडणवीस यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत नाही. पण ते नागपुरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, हे कारण असावे दुसरे कारण नसावे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.