scorecardresearch

…म्हणूनच शिवसेना नंबर ४ वर; शिवसेनेच्या वर्मावर भाजपानं ठेवलं बोट

शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांच्या शाब्दिक कोटंयावर गुजराण करावी लागत आहे, असे भाजपाने म्हटले आहे

Shiv Sainiks have to live on the verbal quota of the CM uddhav Thackeray BJP reply to Sanjay Raut tweet

भाजपाची आणीबाणी मोडून काढायची तर दिल्लीत शिवसेनेसारखा पक्ष हवा. त्यासाठी इतर राज्यांतही शिवसेना वाढवण्यासह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या जिद्दीनेच लढूया, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला होता. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधत काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत आहे कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे अशी टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले.

“सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते”

त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी एक व्यगंचित्र ट्विट करत भाजपाला युतीच्या राजकरणावरुन चिमटा काढला आहे. “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे..बघा नीट..” म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.

“जिंकण्यासाठी आमचा चेहरा वापरल्याचे जानकर आणि मेटेसुद्धा म्हणाले होते”; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना उत्तर

मात्र या व्यगंचित्रावरुनही महाविकास आघाडीच्या निर्यणावरुन संजय राऊत आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्यात आली आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांच्या शाब्दिक कोटंयावर गुजराण करावी लागत आहे, असे म्हटले आहे. केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर देत, “या पेक्षा वाईट परिस्थिती शिवसेनेची आहे. सगळ्या महत्त्वाच्या बैठका शरद पवार घेतात. राष्ट्रवादीच्या खात्याना अजित पवार निधी देतात. शिवसैनिकांना तुमच्या पत्रकार परिषदांवर व मुख्यमंत्र्यांच्या शाब्दिक कोटंयावर गुजराण करावी लागते म्हणूनच शिवसेना नंबर ४ वर आहे,” असे म्हटले आहे.

“डोळ्यासमोर आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना दिसतो तेव्हा..”; उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

दरम्यान, २५ वर्ष आम्ही युतीत सडलो या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांनीही भाष्य केले. “उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या एक जाहीर मेळाव्यात देवेंद्र फडणवीस असाताना हे विधान केलेलं आहे. हे आजचं विधान नाही, हे जुनं विधान आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम आहोत. १९९२ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत जो दंगा उसळला होता, ती हिंदुत्वाची या देशातली सगळ्या मोठी लढाई होती आणि ती लढाई लढताना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आमच्या शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालेलं आहे. आम्ही सगळे वर्षानुवर्षे त्यासाठी माझ्यासह बाळासाहेब ठाकरे आम्ही न्यायालयासमोर उभे राहिलो, खटले लढवले तेव्हा आपण कुठे होतात ही लढाई लढताना? हा प्रश्न जर विचारला तर त्यांच्याजवळ उत्तर आहे का?,” असा सवाल संजय राऊतांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sainiks have to live on the verbal quota of the cm uddhav thackeray bjp reply to sanjay raut tweet abn

ताज्या बातम्या