शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर पुणे महामार्गावरली वरवंड येथे हा अपघात झाला आहे. उस्मानाबाद येथील शिवसेना मेळावा संपल्यानंतर ते पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला.

थोडक्यात जीव वाचला

या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. सावंत हे संपर्क अभियान टप्पा दोनसाठी दोन दिवस भुम, परंडा, वाशी व उस्मानाबाद दौऱ्यावर होते. उस्मानाबाद येथील शिवसंपर्क अभियान संपवून ते पुण्याकडे निघाले होते. सोलापूर पुणे महामार्गावर वरवंड येथे आल्यांनतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. सुदैवाने सावंत या अपघात थोडक्यात बचावल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

घरात बसेन पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही

आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेवर नाराज असून ते भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या चर्चांना सावंत यांनी पुर्णविराम दिला आहे. मी एक वेळ घरी बसेन पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही असे वक्तव्य सावंत यांनी शिवसेना अभियान दरम्यान केले होते.