शिवसेनेचे उपनेते, तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री असलेल्या अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तीन वेळा ते आमदार होते. तर, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशोक शिंदे यांना राज्यमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं. तीन वेळा आमदार राहिलेल्या अशोक शिंदे यांचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराकडून पराभव झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही दिवसांपासून ते शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे व वरिष्ठ नेतेमंडळींकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने, नाराज होते असे सांगितले जात आहे. यामुळेच त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.