अलिबाग– अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना एका जबरी मारहाणीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा  अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आणि दंडही ठोठावला. सन २०१४ मध्ये अलिबाग पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटी आणि मारहाण केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होती. यात दळवी यांच्यासह नऊ आरोपी होती. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांच्या न्यायालयात सुरू होती. त्याचा निकाल शुक्रवारी लागला. अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हा शाबित न झाल्याने सर्व आरोपींची न्यायालयाने मुक्तता केली. मात्र भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, ५०४, ५०६ आणि पोलीस अ‍ॅक्ट १३५ अन्वये अनिल पाटील, अंकुश पाटील, अविनाश म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी या चौघांना न्यायालयाने दोषी ठरविले. तर उर्वरित आरोपींची मुक्तता केली. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर अपील दाखल होईपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्यासाठी आरोपींच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. तो न्यायालयाने मान्य केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla mahendra dalvi sentenced to two years in assault case zws
First published on: 14-05-2022 at 03:41 IST