‘इतिहासात ‘शिवाजी महाराजांनी सुरत लुटले’ असा शब्दप्रयोग आहे. मात्र, हा शब्दप्रयोग मुळातच चुकीच आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला. परंतु तेथून जो खजिना लुटला तो त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी वापरला. त्यामुळे महाराजांनी सुरत लुटले असे म्हणणे योग्य ठरणार नाही,’अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांवर स्तुतिसुमने उधळली.
सांगली येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेतर्फे मानगड ते रायगड पायी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेचा समारोप रविवारी रायगड किल्ल्यावर झाला. यावेळी  मोदी म्हणाले, ‘इंग्रजांनी लिहिलेल्या इतिहासाने निर्माण केलेली गुलामगिरीची मानसिकता झटकण्यासाठी खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना देश योद्धा म्हणून ओळखतो. परंतु तेवढीच त्यांची ओळख नाही. ते कुशल प्रशासक, मानव संसाधन व्यवस्थापकही होते. महात्मा गांधी म्हटले की अिहसा अशीच प्रतिमा रूढ आहे. गांधीजींनी ब्रिटिशांशी कडवा लढा दिला. हे वास्तव आपण भारतीय का विसरतो.’
“स्थानिकांच्या मदतीशिवाय शिवरायांना औरंगजेबाचा सुरतमधील खजिना लुटणे अशक्य होते. महाराजांनी या कामी तेथील तळागाळातील लोकांनीच साह्य़ केले. या खजिन्याचा वापर शिवरायांनी जनतेच्या कल्याणासाठीच केला होता.”
नरेंद्र मोदी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji didnt loot surat says narendra modi
First published on: 06-01-2014 at 02:10 IST