किल्ले प्रतापगडावर बुधवार दि ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत शिवप्रताप दिनाचे आयोजन प्रशासनाने केले आहे. मुख्य बुरूजावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकाविण्यात येणार आहे. शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडाला फुलांनी सजविण्यात येत असून संपुर्ण गडाला विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच या दिवशी प्रशासन व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा- प्रत्येक तालुक्यात हेलीपॅड उभारण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश; वैद्यकीय मदतीसाठी होणार उपयोग

यंदाच्या शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला मोठया संख्येने शिवभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी मागील दोन दिवस प्रतापगडावर उपस्थित आहेत.

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबर परीसरातील अनधिकृत बांधकाम मागील वीस वर्षांपासुन वादात अडकले होते. हे बांधकाम काढून टाकावे यासाठी देशभरातील शिवभक्त व हिंदुत्ववादी संघटना अधिक आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे हा परीसरात कायम तणावपुर्ण स्थिती झाली होती. परीसरात प्रवेश बंदी करून तेथे कायम मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने १० नोव्हेंबर रोजी मोठ्या पोलिस बंदोबस्तात विनापरवाना सर्व बांधकाम उध्वस्त केले. यामुळे परीसरातील तणाव निवळला आहे. कबर परीसरातील बांधकामावरून सुरू झालेला वाद संपुष्टात आल्याने मोठया उत्साहात शिवप्रतापदिन साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनास दिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशाची अंमजलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे स्वतः किल्ले प्रतापगडावर कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहेत यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किल्ले प्रतापगडावर येणार आहेत.

हेही वाचा- संजय राऊतांना कोर्टात बोलवून अटक होणार? कटकारस्थानाबाबत मोठा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला २९ नोव्हेंबरपासून सुरूवात करण्यात येणार आहे. यावेळी किल्ले प्रतापगडावर लेजर शोचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतापगडाला फुलांनी सजविण्यात येणार असून संपूर्ण गडाला विदयुत रोषणाई करण्यात येत आहे. बुधवारीं पहाटे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांच्या हस्ते भवानी मातेला अभिषेक व पूजा होणार आहे. मुख्य बुरूजावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकाविण्यात येणार आहे. शिवपुतळयावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच साहसी खेळांचे प्रात्यक्षिक आयोजित केले आहे. शिवप्रतापदिन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे व वनमंत्री मुनगंटीवार व पालकमंत्री देसाई आमदार पाटील हे अफजलखान कबर परीसराला भेट देणार आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईची पाहणी करणार आहेत. कारवाईनंतर मोकळे मैदान तयार करण्यात आले आहे. या मैदानावर वन विभागाच्यावतीने मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी वनमंत्री सुधीर मनगंटीवार पालकमंत्री शंभुराज देसाई आ मकरंद पाटील प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव तहसिलदार सुषमा चौधरी पाटील पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.