सरसंघचालक मोहन भागवत यांनी २२ सप्टेंबर रोजी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासींची मशिदीत भेट घेतली. तसेच, त्यापूर्वी त्यांनी अन्य मुस्लिम नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला संबोधित करत होते.

“मोहन भागवतांबद्दल मला आदर आहे. अलीकडच्या काळात मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिली. मोहन भागवतांनी हिंदूत्व सोडलं, की शिंदे गटाने नमाज पडायला सुरूवात केली. कशासाठी तर, संवाद साधण्यासाठी मोहन भागवत तिथे गेले होते. तिथे गेल्यावर मुस्लिमांनी सांगितलं, मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ आहेत. आम्ही तर त्यांना ‘राष्ट्रपती’ करण्याची मागणी केली होती,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

हेही वाचा – “होय गद्दारच! कारण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“छत्रपती शिवाजी महाराजांची तिच शिकवण…”

“मोहन भागवतांनी मुस्लिमांबरोबर बोललं, तर त्यांचं राष्ट्रीय कार्य सुरु आहे. आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडलं. कुठले धागेदोरे कुठे लावतात, कसला आभास निर्माण करतात. महिला आणि पुरुषांत समानता असल्याचं मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तिच शिकवण आहे. आम्ही सुद्धा मातृभक्त, पितृभक्तच आहोत,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.