मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, पण सध्या तीनचाकी कार नाही पण सरकार चालवतो आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. विरोधकाकंडून महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना हे तीनचाकी सरकार असल्याचा वारंवार उल्लेख केला जातो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सरकार स्थापन केल्याने ही टीका वारंवार केली जात असून, त्यामुळे हे सरकार टिकणार नाही असा वारंवार दावा विरोधक करताना दिसतात. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या टिकेला उत्तर दिलं आहे. ३१ व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, “आमच्यावर तीनचाकी सरकार असल्याची टीका होत आहे. तीनचाकी तर तीनचाकी… पण आमचं सरकार चालत आहे ना हे महत्त्वाचं आहे. समतोल जमला पाहिजे मग दोन चाकं असो किंवा तीन चाकं असो”. चार चाकं असूनही आपटायचे ते आपटले आहेत असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. “जो चालवणारा असतो त्याच्या हातातील चाक महत्त्वाचं असतं. ते खरं नियंत्रण करत असतं. त्या चाकावर गाडी चालत असते. त्या चालवणाऱ्याला सगळे नियम सांगणं महत्त्वाचं,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सरकार तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे – देवेंद्र फडणवीस</strong>
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकार तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असल्याची टीका केली होती. “इतका मोठा विरोधाभास असल्याचे सरकार राज्यात सत्तेत येणार आहे. दोन चाकं असणारं वाहन धावतं पण तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असणाऱ्या या सरकारची चाकं तीन दिशेला धावली तर काय होईल?,” असा टोला त्यांनी लगावला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena cm uddhav thackeray mahavikas aghadi government sgy
First published on: 13-01-2020 at 16:13 IST