“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुठे लिंबू फिरवलं आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही”, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गोगावले यांच्या विधानामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- भाजपच्या कितीही ‘कुळय़ा’ आल्या तरी सेना संपणार नाही!; उद्धव ठाकरे यांचा इशारा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव

भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेससोबत युती करत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. या सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव मिळत असल्याची तक्रार अनेकदा गोगावलेंनी उद्धव ठाकरेंकडे केली होती. अखेर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत युती केली आणि राज्यात नवे सरकार स्थापन केले. मात्र, “शिवसेनेने भाजपासोबत युती केली असती तर आम्ही पाच पावले मागे आलो असतो”, असेही गोगावले म्हणाले.

हेही वाचा- विस्ताराला ३९ दिवस तर खातेवाटपाला किती?; सारेच मंत्री बिनखात्याचे

मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे गोगावले नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, आपण नाराज नसल्याचे म्हणत गोगावले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात रायगडच्या एकाही आमदाराला स्थान मिळाले नसल्यामुळे रायगडात नाराजीचा सूर होता. परंतु, गोगावले यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे.