राज्य सरकार आपल्या राज्यातल्या हिंदूंसहीत कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करू शकतं. केंद्राने सुप्रीम कोर्टात ही माहिती दिली आहे. राज्य पातळीवर अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जावं यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्याचे निर्देश देण्यासंदर्भातली याचिका अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केली होती. या याचिकेवर उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. दरम्यान यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“देशात काही राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. कर्नाटकात, सीमा भागात मराठी अल्पसंख्यांक आहे. त्याच्यावर अन्याय, अत्याचार, दडपशाही होत आहे त्याविषय़ी बोललं पाहिजे. त्यासंबंधी केंद्रात एक याचिका आहे, पण त्यावर कोणी बोलत नाही. ते हिंदू नाहीत का? तेदेखील हिंदूच आहेत. असे अनेक विषय चर्चेला येतील आणि आम्ही त्यावर चर्चा करु,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Why Indian Muslims are banish from elections
भारतीय मुस्लीम निवडणुकीतून हद्दपार का?
opposition india alliance
बिहार ते महाराष्ट्र; लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसला करावी लागतेय तारेवरची कसरत

राज्य सरकार कोणत्याही समुदायाला अल्पसंख्याक घोषित करू शकतं; केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. लोकसत्ताच्या व्यासपीठावरुन बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दावा केला आहे. यानंतर नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजय राऊतांनी यावरही भाष्य केलं.

धर्मेंद्र प्रधान यांनी नाणारच्या पुनरुज्जीवनाचे संकेत दिल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“त्यांनी होईल असं म्हटलं असून झालेलं नाही. स्थानिकांचं मतपरिवर्तन झाल्याची माहिती माझ्याकडे नाही. हेमंत प्रधान आता त्या खात्याचे मंत्री नाहीत, ते देशाचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी शिक्षणावर अधिक बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखतो, ते फार हुशार मंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या काळात मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर –

“सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचं आगमन होणं महत्वाची गोष्ट आहे. सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण शिवसेनेचा बालकिल्ला आहे. आदित्य ठाकरे कार्यक्रमासाठी जात असून शिवसैनिक आणि सिंधुदुर्गामधील जनता त्यांचं स्वागत करेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दापोलीतील सोमय्या आणि सांगलीमधील पडळकर यांच्या आंदोलनावर बोलताना संजय राऊत यांनी वैफल्यग्रस्त माणसं, पक्ष, नेते कोणत्या थऱाला जाऊ शकतात त्याचं हे उदाहरण असल्याचा टोला लगावला. तसंच जनताच त्याचा निर्णय घेईल असंही सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “अहिल्याबाई होळकर किंवा महाराष्ट्रात जन्म झालेल्या महापुरुषांचं राजकारण करु नये. शरद पवारांसारख्या नेत्याच्या हातून एका स्मारकारंच उद्धाटन होत असताना अशाप्रकारे राजकीय विरोध होत असेल तर लोकांच्या मानसिकतेमध्ये गडबड आहे”.

“देशात काही राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. कर्नाटकात, सीमा भागात मराठी अल्पसंख्यांक आहे. त्याच्यावर अन्याय, अत्याचार, दडपशाही होत आहे त्याविषय़ी बोललं पाहिजे. त्यासंबंधी केंद्रात एक याचिका आहे, पण त्यावर कोणी बोलत नाही. ते हिंदू नाहीत का? तेदेखील हिंदूच आहेत. असे अनेक विषय चर्चेला येतील आणि आम्ही त्यावर चर्चा करु,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

“गोव्याच्या जनतेने भाजपाला बहुमत दिलं असून आम्ही त्याचं अभिनंदन करतो. नवीन सरकार येत असेल तर गोव्याच्या विकासासाठी, जाहीरनाम्यात दिलेली वचनं त्यांनी पूर्ण करावीत. पाच लाख रोजगार निर्माण करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण मग १० वर्ष तुमचं राज्य होतं तेव्हा तुम्ही काय केलं हा प्रश्न आम्ही विचारला होता,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“गेल्या ५०-५५ वर्षांपेक्षा अधिक काळ सर्वाधिक रोजगार सार्वजनिक विभाग, सरकारी उद्योगांनी दिला आहे. हे उद्योग संपवून फक्त मर्जीतल्या दोन-पाच खासगी उद्योजकांना संपूर्ण देश ताब्यात दिल्याने रोजगार वाढणार नाही. फक्त मोजक्या लोकांची आणि पर्यायाने भाजपाची संपत्ती वाढेल. कोट्यवधी लोक हे भिकारी आणि बेरोजगारी होतील त्याविरोधा हा लोकांचा संताप, बंद आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

“देवाच्या चरणी प्रत्येकाने खरं बोललं पाहिजे. जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, हिदुत्ववादाचा पुरस्कार करत आहात, देव, धर्म आणि देश मानत आहात तर आपलं वर्तन काय, देवाच्या दरबारात किती खरं बोलत आहोत हे तपासून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ज्या प्रकारचा खोटेपणाचा कळस उभारला जात आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामीची मोहिम राबवली जात आहे, षडयंत्र रचललं जात आहे, लफंगेगिरी सुरु आहे त्याला हिंदुत्ववादात स्थान नाही. सध्या विरोधी पक्षाचं खोटं बोला पण रेटून बोला सुरु आहे. पण त्यांनी खऱं बोलावं, महाराष्ट्राची हीच परंपरा आहे,” असा सल्ला संजय राऊतांनी यावेळी दिला.