गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. आता शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं निश्चित झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून राज्य सरकारने फसवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच, संजय राऊतांना देखील लक्ष्य केलं जात असताना आता संजय राऊतांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांना प्रत्युत्तर दिलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीबद्दल नेमक्या काय घडामोडी घडल्या, याविषयी संजय राऊतांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

“आमच्याकडून विषय संपला आहे”

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीविषयी विचारणा केली असता संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना “आमच्यासाठी तो विषय संपला आहे”, असं म्हणत या मुद्द्यावर पडदा टाकला आहे. मात्र, असं असलं, तरी संभाजीराजेंच्या समर्थकांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्थी न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत त्यांनाच विरोध करता. या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे, असं असताना देखील संजय राऊत हे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत”, असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “संजय राऊतांचा वैयक्तिक काय संबंध आहे? गेल्या १५ दिवसांतल्या घडामोडी समजून घ्यायला हव्यात. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

“छत्रपतींना राजकीय पक्षांचं वावडं असण्याचं कारण नाही”

“निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा लागतो. ही ४२ मतं आम्ही छत्रपती संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. आमची भूमिका इतकीच होती की ही जागा शिवसेनेची आहे. आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा. बरं छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. यापूर्वी स्वत: सिनिअर शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनीही काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मालोजीराजे भोसले यांनी देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आहे. ते राष्ट्रवादीचे आमदार होते. स्वत: युवराज छत्रपती संभाजी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले आहेत आणि पराभूत झाले आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातले राजकीय पक्षात जात नाही हा त्यांच्या समर्थकांचा दावा योग्य नाही”, असं राऊतांनी यावेळी नमूद केलं.

“४२ मतं संभाजीराजेंना द्यायचं नक्की झालं होतं”

“देशभरातील अनेक राजघराणी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षात जाऊन त्यांचं सामाजिक कार्य पुढे नेत असतात. ४२ मतं संभाजीराजे छत्रपतींना देऊन राज्यसभेवर पाठवण्याचं उद्धव ठाकरेंनी नक्की केलं होतं. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती. त्यांच्या समर्थकांनी १५ दिवसांतल्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.